पणजी: गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GSIDC) ने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून या महिन्यापासून अटल सेतूची कामे करण्यास आणि ते खड्डेमुक्त करण्याची परवानगी मागितली आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे, असा अहवाल मुरारी शेट्ये यांनी दिला आहे. हॉट-मिक्स लेयर आणि थ्री-लेयर मेम्ब्रेन काढून टाकाण्यासाठी कॉर्पोरेशनला अटल सेतू अर्धा बंद करायचा आहे.
(GSIDC has written to North Goa Collector seeking permission to carry out Atal Setu works in goa )
आयआयटी-मद्रासने जीएसआयडीसीला दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, हॉट-मिक्स लेयर आणि थ्री-लेयर मेम्ब्रेन काढून टाकाण्याची गरज आहे.
गोवा पोलिसांच्या वाहतूक कक्षाशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिली जाईल. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली, पुलाचा फक्त फोंडयाला जोडणारा रस्ता दुरुस्तीसाठी बंद केला जाईल ते पुढे म्हणाले, "आम्ही चार महिने पूल बंद करणार नाही कारण त्यामुळे लोकांची गैरसोय होणार आहे.
वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अटल सेतूवर अनेक अपघात झाले आहेत. वेगवान वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक कक्षाने वेगावर निर्बंध लादले आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली.
581 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलावर खड्डे पडणे ही नित्याचीच बाब झाली आहे. जानेवारी 2019 मध्ये उद्घाटन झाले असले तरी, अटल सेतू अपूर्ण आहे आणि GSIDC ने अद्याप L&T ला पूर्णत्व प्रमाणपत्र जारी केलेले नाही. करारामध्ये नमूद केलेल्या पाच वर्षांच्या करार कालावधीसह, L&T सरकारी तिजोरीवर कोणताही खर्च न करता अटल सेतूची दुरुस्ती करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.