डिचोली, कारापूर-सर्वण गावाला आता नवीन पंचायतघर मिळणार आहे. सुवर्ण महोत्सव निधीअंतर्गत या पंचायतीसाठी एक कोटी खर्च करुन नवीन पंचायतघर बांधण्यात येणार आहे.
१६ मार्च रोजी एका विशेष सोहळ्यात विधीवत भूमिपूजन झाल्यानंतर आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.
कारापूर-सर्वण पंचायतीची इमारत कमकुवत झाल्याने ती मोडण्यात आली असून, या जागेतच हा नवीन प्रकल्प उभा राहणार आहे. पायाभरणी सोहळ्यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, मावळते सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, उपसरपंच उज्वला कवळेकर, पंचसदस्य सुकांती खारकांडे, ज्ञानेश्वर बाले,
माजी सरपंच सौ. खारकांडे, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, मयेचे सरपंच विद्यानंद कारबोटकर, पिळगावची सरपंच मोहिनी जल्मी, वन-म्हावळींगेची माजी सरपंच शीतल सावळ, भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, सचिव विश्वास चोडणकर, महिला मोर्चाची अध्यक्ष श्रुती जल्मी तसेच भाजप कार्यकर्ते, विविध पंचायतींचे पंचसदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रीडा मैदानाचा प्रस्ताव
जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले. पंचायत क्षेत्रात क्रीडामैदान उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी प्रयत्नही चालू आहेत. कारापुरच्या कोळम तळ्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार असल्याचेही प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले. विकासकामांबाबत आमदारांकडून आवश्यक सहकार्य मिळत आहे. असे उज्वला कवळेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.