पणजी : कला अकादमीच्या अध्यक्षपदी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीही गोविंद गावडे कला अकादमीच्या अध्यक्षपदी होते. आता मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी गावडेंकडे देण्यात आली आहे. (Govind Gaude appointed as chairman of kala academy News Updates)
राज्य सरकारकडून मंत्री गोविंद गावडेंच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या परिपत्रकात गावडेंची नियुक्ती परिपत्रक काढल्यापासून लगेच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कला अकादमीच्या नुतनीकरणाचं काम सध्या सुरु आहे. त्यामुळे गोविंद गावडे पुन्हा अध्यक्षपदी आल्यानंतर नुतनीकरणाचं काम गतीमान करतील अशी अपेक्षा कलाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान राज्यातील क्रीडा क्षेत्रातील मरगळ दूर करणार असल्याची घोषणा कला आणि संस्कृती तथा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केली आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती करणार तातडीने करणार असल्याचंही गावडे म्हणाले आहेत. गोव्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार असून त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता प्राधान्याने करणार असल्याची माहितीही क्रीडामंत्री गोविंद गावडेंनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.