Colvale Jail: नवीन वर्षात कोलवाळ जेलमधील कैद्यांसाठी खुशखबर! कैद्यांना मिळणार उत्पन्नाचे साधन

गोव्यातील कोलवाळ- कारागृह हे नेहमी वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत असतं. परंतु सध्या हे कारागृह एका चांगल्या गोष्टीमुळे चर्चेत आलंय.
Colvale Jail
Colvale JailDainik Gomantak
Published on
Updated on

ज्या कैद्यांच्या हातात कला-गुण आहेत, अशा कैद्यांना मजुरी देऊन काम करून घेतले जाते. त्यासाठी बहुतांश राज्यातील कारागृहात शेती, उद्योग, कारखाने आणि प्रकल्प सुरू करण्यात आले असून त्यामध्ये प्रशिक्षणानंतर कैद्यांना कामावर ठेवले जाते. काही राज्यातील मध्यवर्ती व जिल्हा कारागृहात असणारे कच्चे कैदी आणि शिक्षा झालेल्या कैदी या उद्योगधंद्याबरोबर शेतीमध्येही काम करतात. गोव्यातील कोलवाळ- कारागृह हे नेहमी वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत असतं. परंतु सध्या हे कारागृह एका चांगल्या गोष्टीमुळे चर्चेत आलंय.

कोलवाळ कारागृहातील दोषींनी तयार केलेल्या चपात्या लवकरच राज्यातील रुग्णालयांमध्ये देण्यात येतील अशी सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन वर्षात गोव्यातील रुग्णालये आणि कार्यालयांमध्ये चपाती विकून कंपनीचा चांगला उपयोग करण्याचा विचार तुरुंग अधिकारी करत आहेत. नवीन एक चांगला उपक्रम या निमिताने कारागृह प्रशासन राबवत आहे. या बाबत सविस्तर बातमी अशी कि,

कोलवाळ तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आणि पुनर्वसनाखाली असलेल्या दोषींनी तयार केलेल्या चपात्या लवकरच राज्यातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. नवीन वर्षात गोव्यातील रुग्णालये आणि कार्यालयांमध्ये चपाती विकून चांगला फायदा करण्याचा विचार तुरुंग अधिकारी करत आहेत. या बाबत कारागृहाचे निरीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी माहिती दिली आहे.

Colvale Jail
Domnic-Joan Case : ...अन्यथा आम्ही उपोषणाला बसू; डॉम्निक-जोनच्या अनुयायांचा सरकारला इशारा

बॉस्को जॉर्ज म्हणाले, “आम्ही रोटी मेकरसाठी ठोस योजना आणण्याची आशा करत आहोत. आम्ही एक योग्य प्रस्ताव तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून नवीन वर्षात आपण काहीतरी सुरुवात करू अशी आशा आहे. कारागृहाला अलीकडेच एका स्थानिक संस्थेकडून ख्रिसमस भेट म्हणून चपाती मेकर मिळाला आहे. या मशीनद्वारे एका तासात 1000 चपात्या तयार होऊ शकतात. त्यामुळे या तयार झालेल्या चपात्या कैद्यांसाठी उपयोगात येऊन त्यानंतर तर कैद्यांसाठी उत्पन्न मिळविण्यासाठी देखील वापरल्या जाऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com