Bhandari Community In Goa: गोव्यात भंडारी समाजात खलबतं! गणेशोत्सवातून मोर्चे बांधणी

Gomantak Bhandari Samaj: गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आमसभा घेण्यास आणि नव्या समितीची निवडणूक घेण्यास स्थगितीचा विषय चर्चेत येत आहे
Gomantak Bhandari Samaj: गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आमसभा घेण्यास आणि नव्या समितीची निवडणूक घेण्यास स्थगितीचा विषय चर्चेत येत आहे
Gomantak Bhandari SamajDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमंतक भंडारी समाजाची आमसभा घेऊन, नवी समिती निवडण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी सरचिटणीस उपेंद्र गावकर यांनी आमसभेची दिलेली नोटीस व निवडणूक कार्यक्रमाला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

गणेशचतुर्थीच्या निमित्ताने भंडारी समाजाचे नेते एकमेकांच्या घरी भेट देत आहेत. त्यावेळी न्यायालयाने आमसभा घेण्यास आणि नव्या समितीची निवडणूक घेण्यास स्थगितीचा विषय चर्चेत येत आहे. स्थगिती मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणे, हाच एकमेव पर्याय असल्याचे मत या चर्चेतून तयार झाले आहे. यासाठी भंडारी नेते लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर दाद मागतील, असे सांगण्यात येत आहे.

समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरमध्ये त्यांच्या समितीची मुदत संपते, त्याचवेळी निवडणूक घेण्यात येईल. त्यांनी पणजीत तालुका समित्यांची बैठक बोलावली होती, तेव्हाही निवडणूक केव्हा घेणार, या प्रश्नावर त्यांची कोंडी करण्यात आली होती. आताही त्यांच्या विरोधात बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. एका जागी भेटून या बैठका होत नसून गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जात तेथेच समविचारी जमून विचारविनिमय करत या बैठका होत आहेत.

Gomantak Bhandari Samaj: गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आमसभा घेण्यास आणि नव्या समितीची निवडणूक घेण्यास स्थगितीचा विषय चर्चेत येत आहे
Bhandari Community In Goa: गैरव्‍यवहार, लूट सुरू; निवडणूक कधी घेणार? भंडारी नेते संतप्त

प्रयत्‍न स्‍थगिती उठवण्‍यासाठी

उपेंद्र गावकर हे मागील निवडणुकीत सरचिटणीसपदी निवडून आले होते. ते विरोधी पॅनलमधील एकमेव विजयी उमेदवार होते. ते सलग तीन बैठकांना अनुपस्थित राहिल्याने त्यांना नियमानुसार पदावरून हटवण्यात आल्याची भूमिका नव्या समितीने घेतली होती. त्याआधारे गावकर यांनी दिलेल्या आमसभा बैठक नोटिसीला आणि निवडणूक कार्यक्रमाला समितीने न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. मात्र, याच समितीने संस्थेच्या नोंदणीच्या नूतनीकरणावेळी संस्था निबंधक कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रांत गावकर यांचे नाव सरचिटणीस म्हणून देण्यात आले आहे. त्‍याचाच आधार घेत न्यायालयीन स्थगिती उठवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

सध्या चर्चेत बरेच मुद्दे आहेत. पुढे काय करावे याविषयी विचारमंथन निश्चितपणे सुरू आहे. कायदेशीर लढ्याशिवाय पर्यायही दिसत नाही.

उपेंद्र गावकर, भंडारी समाज नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com