Panaji News : ‘गोल्डनमॅन’ बनला ‘सेल्फी झोन’; सेरेंडिपिटीत युवक

Panaji News : युवतींसाठी आकर्षण : दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य
Goldenman Mohan Kumar.
Goldenman Mohan Kumar.Dainik Gomantak

सचिन कोरडे

Panaji News : पणजी, सोनेरी रंगाचे कपडे परिधान करून अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम सध्या सेरेंडिपिटी महोत्सवात एक ‘गोल्डनमॅन’ करीत आहे. यंदाच्या या महोत्सवात तो आर्कषणाचे केंद्र बनला आहे.

युवक-युवती त्याच्याभोवती गराडा घालत असून त्यांना त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला जात नाही. त्यामुळे तो ‘सेल्फी झोन’ही बनला आहे.

उठल्या उठल्या दोन तास ‘मेक अप’ आणि त्यानंतर तासन्‌तास पुतळ्याप्रमाणे (स्टॅच्यू) उभे राहण्याचा बिहारच्या या कलाकाराचा प्रयत्न असतो. मोहन कुमारपेक्षा ‘गोल्डनमॅन’ म्हणूनच त्याची अधिक ओळख बनली आहे.

मोहन कुमार गेल्या सहा-सात वर्षांपासून ‘गोल्डनमॅन’ची भूमिका साकारत आहे. याकडे वळण्याचा त्याचा प्रवासही मोठा प्रेरणादायी आहे. तो सांगतो, की मी एका कपड्याच्या कंपनीत कामाला होतो.

तेथे मजुरी करीत असताना कपड्यांकडे पाहूनच मला सोनेरी रंगाचे कपडे बनविण्याची कल्पना सुचली. मात्र, ती मालकाला पसंत पडली नाही. त्यामुळे मला ते काम सोडावे लागले. बेरोजगार बनल्यानंतर मी कामाच्या शोधात होतो. मात्र, काम मिळाले नव्हते.

त्यामुळे स्वत:जवळील कपड्यांना सोनरी रंग चढवून एका चाैकात उभा राहिलो. त्यावेळी माझ्यासोबत अनेकांनी फोटो काढले आणि तेथून माझा हा प्रवास सुरू झाला.

गोवा पोलिसांनी मागितले पैसे

सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरू असल्यामुळे मला कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर ‘स्टॅच्यू’ म्हणून उभे राहायचे होते. मात्र, तेथील पोलिसांनी मला हाकलून लावले. एवढेच, नव्हे तर माझ्याकडे पैशांची मागणी केली. गोव्याच्या प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी मोहन कुमारने केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com