Goa University Election: गोवा विद्यापीठातील विद्यार्थी मंडळाची निवडणूक रंगणार; प्रोग्रेसिव्ह आणि टुगेदर पॅनल आमने-सामने

Progressive Goa University Vs Together for Goa University: गोवा विद्यापीठातील विद्यार्थी मंडळाची (कॅम्पस) निवडणूक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दु. २ वा. दरम्यान होणार आहे.
Goa University Election: गोवा विद्यापीठातील विद्यार्थी मंडळाची निवडणूक रंगणार; प्रोग्रेसिव्ह आणि टुगेदर पॅनल आमने-सामने
Goa University Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा विद्यापीठातील विद्यार्थी मंडळाची (कॅम्पस) निवडणूक ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दु. २ वा. दरम्यान होणार आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने प्रोग्रेसिव्ह गोवा युनिवर्सिटी आणि टुगेदर फॉर गोवा युनिवर्सिटी असे दोन पॅनेल समोरासमोर उभे ठाकले आहेत. प्रोग्रेसिव्ह गोवा युनिवर्सिटी या पॅनेलला एनएसयूआय गोवा या विद्यार्थी संघटनेने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. तसेच टुगेदर फॉर गोवा युनिवर्सिटी यांना अभाविपने अघोषित पाठिंबा दिला असल्याची चर्चा आहे.

प्रोग्रेसिव्ह गोवा युनिवर्सिटी पॅनेलतर्फे ऋषभ फळदेसाई अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत तर महिला प्रतिनिधी किशिया प्रभुदेसाई, सचिव पदासाठी गणराज गावस, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिनिधी पदासाठी जेसुसली फर्नांडिस, संशोधन विद्यार्थी प्रतिनिधी पदासाठी परेश गावकर यांनी अर्ज भरले आहेत तर टुगेदर फॉर गोवा युनिव्हर्सिटीच्या पॅनेलच्यावतीने अध्यक्ष पदासाठी सतेज खांडेपारकर, सचिव पदासाठी चेतन नाईक, क्रीडा आणि सांस्कृतिक सचिव पदासाठी वैभव पै, महिला प्रतिनिधीसाठी प्रभा ऊर्फ करुणा नाईक, संशोधन विद्यार्थी प्रतिनिधीसाठी विज्वल प्रभुदेसाई यांनी अर्ज भरले आहेत. दोन्ही पॅनेलचे पार जड असल्याची चर्चा विद्यापीठात सुरू आहे.

प्रोग्रेसिव्ह युनिव्हर्सिटी पॅनेलचा जाहीरनामा

टुगेदर फॉर गोवा युनिवर्सिटी पॅनेलने अजून आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. मात्र, प्रोग्रेसिव्ह युनिव्हर्सिटी पॅनेलने आपल्या जाहीरनाम्यात विद्यार्थी पंचायत, महिला सुरक्षा, विद्यापीठ आवारात मोफत व्हाय-फाय, पी.एचडी फी कमी करणे, मासिक पाळी दरम्यान रजा, विद्यापीठात ईव्ही चार्जिंग पॉइंट आदी विविध गोष्टी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com