Traditional Fishing: मासेमारीला थंडा प्रतिसाद, ओहोटी असल्‍याने फक्‍त 40 ट्रॉलर्स समुद्रात रवाना

बोटींचे तांडेल आणि परराज्‍यांतील अन्‍य कामगार अजूनही गोव्‍यात पोचलेले नाहीत. त्‍यामुळे 80 टक्‍के ट्रॉलर्स जेटीवरच ठेवण्‍यात आल्‍या आहेत.
Traditional Fishing
Traditional FishingDainik Gomantak

Traditional Fishing गोव्‍यात मासेमारीवरील बंदी उठली असली तरी परराज्‍यांतील कामगार अजूनही गोव्‍यात न पोचल्‍याने आज पहिल्‍या दिवशी फक्‍त ४० ट्रॉलर्स मासेमारीसाठी रवाना झाले. आज समुद्राला ओहोटी असल्‍यामुळे जास्‍त ट्रॉलर्स पाण्‍यात जाऊ शकले नाहीत. त्‍यामुळे पहिल्‍या दिवशी मासेमारीला थंडाच प्रतिसाद लाभला.

बोटींचे तांडेल आणि परराज्‍यांतील अन्‍य कामगार अजूनही गोव्‍यात पोचलेले नाहीत. त्‍यामुळे ८० टक्‍के ट्रॉलर्स जेटीवरच ठेवण्‍यात आल्‍या आहेत. हे कामगार हळूहळू येतील. ते आल्‍यानंतरच हा व्‍यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू होणार अशी माहिती कुटबण मच्‍छीमार सोसायटीचे अध्‍यक्ष विनय तारी यांनी दिली.

कुटबण जेटीवर छोटे आणि मोठे असे सुमारे 300 ट्रॉलर्स आहेत. या ट्रॉलर्सवर काम करण्‍यासाठी मुख्‍यत: ओडिशा, प. बंगाल. झारखंड व बिहार या राज्‍यातून कामगार आणले जातात. तर तांडेल हे मुख्‍यत: गुजरात व कर्नाटकातील असतात.

यावेळी मोसम एवढ्या लवकर सुरु होणार याची कल्‍पना नसल्‍याने कामगारांनी यायला सुरूवात केलेली नाही अशी माहिती अन्‍य एक मच्‍छीामार सावियो डिसिल्‍वा यांनी दिली.

15 ऑगस्‍टपर्यंत सर्व कामगार येथे पोचण्‍याची शक्‍यता असून त्‍यानंतरच हा व्‍यवसाय पूर्ण जोमाने सुरू होणार असे त्‍यांनी सांगितले.

‘यलो अलर्ट’चाही परिणाम

दरम्यान, हवामान खात्याने उद्यापासून तीन दिवस यलो अलर्ट जाहीर केला असून, मच्छिमारांनी खोल समुद्रात उतरू नये, असे आवाहन केले आहे. परिणामी राज्यातील मच्छिमार उद्या मंगळवारी सुध्दा समुद्रात उतरण्याची शक्यता कमी झाली आहे.

शिवाय मच्छिमारी बोटींवरील कामगारही गावाहून परतलेले नाहीत. त्यामुळे मासळीची राज्यात आवक अपेक्षेप्रमाणे वाढण्याची शक्यता काहीशी कमी आहे.

Traditional Fishing
Porvorim Theft Case: गोवा वेल्हामधील दुचाकी चोरीप्रकरणी एकाला अटक; पर्वरी पोलिसांची कारवाई

कामगार न आल्‍यामुळे बहुतांश ट्रॉलर्स अजून समुद्रात गेलेले नाहीत. त्‍यामुळेच यासाठी आणखी काही दिवस आम्‍हाला वाट पाहावी लागेल. एका बाजूने कामगार मिळणे कठीण होत आहे तर दुसऱ्या बाजूने मच्‍छीमार खात्‍याने ज्‍या जाचक अटी घातल्‍या आहेत त्‍यामुळे आमची अडचण अधिकच वाढली आहे. सरकारने या अटी शिथिल करण्‍याची गरज आहे.

- विनय तारी, कुटबण मच्‍छीमार सोसायटी अध्‍यक्ष

Traditional Fishing
Goa Dengue Case: धक्कादायक! म्हापशात डेंग्यूचा फैलाव; आतापर्यंत 'एवढ्या' रुग्णांची नोंद

कुटबण जेटीवर लगबग सुरू

कुटबण जेटीला आज भेट दिली असता, तिथे ट्रॉलरमालकांची लगबग दिसून येत होती. जेटीवर मोठ्या प्रमाणावर मोठे ट्रॉलर्स नांगरुन ठेवले असून ते 10 ऑगस्‍टनंतर समुद्रात जातील अशी माहिती रिचर्ड फर्नांडिस यांनी दिली.

ते म्‍हणाले, आज काही ट्रॉलर्स समुद्रात गेले. यातील काही रात्री परत येऊ शकतात. मात्र जेटीवर सगळीकडेच ट्रॉलर्स नांगरून ठेवल्‍याने आणलेले मासे उतरवायचे कुठे असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. यावर मच्‍छीमार खात्‍याने तोडगा काढण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Traditional Fishing
Goa Assembly Session: कापोर्डेतील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक वृत्त, बारा वर्षांपासूनच्या पायपीटीचा प्रश्न सुटणार..

मागचे काही दिवस समुद्र खवळलेला होता. तो शांत होऊन एवढ्या लवकर मच्‍छिमारी मोसम सुरू होणार याची कुणालाही कल्‍पना नव्‍हती. यामुळेच कामगारांना गोव्‍यात आणण्‍यास ट्रॉलरमालकांनी हवी ती तत्‍परता दाखवली नाही.

याचाच परिणाम म्‍हणजे आतापर्यंत फक्‍त दहा टक्केच कामगार गोव्‍यात पोचले आहेत. हे सर्व कामगार आल्‍याशिवाय मच्‍छिमारी पूर्ण जोमाने सुरू होणे कठीण आहे.

- सावियो डिसिल्‍वा, मत्‍स्‍योद्योजक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com