Goa News Update: दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Goa Today's News Update Breaking News 18 March 2024: गोव्यातील राजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा आणि अन्य क्षेत्रातील ठळक घडामोडींचा आढावा.
Goa Online News Update | Breakings In Marathi | Goa Loksabha Election
Goa Online News Update | Breakings In Marathi | Goa Loksabha ElectionDainik Gomantak

ग्राहकांनो थकीत वीज बिल भरणा करा, अन्यथा...

विद्यत विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयामार्फत बार्देश तालुक्यातील ग्राहकांना थकीत वीज बिल भरण्यासंबंधी आवाहन करण्यात आले आहे. वीज बिल भरणा न केल्यास कोणत्याही आगावू सूचनेशिवाय ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केला जाईल असेही कळवण्यात आले आहे.

भाजप दक्षिण गोवा उमेदवाराचे नाव दोन दिवसांत जाहीर होणार - तानावडे

भाजप उमेदवाराचे नाव उद्या किंवा परवा जाहीर होण्याची शक्यता. भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद गोव्यात दाखल. केंद्राने कुठल्याही उमेदवार दिला तरी भाजप कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही दोन्ही जागी जिंकून आणू असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले.

Goa Loksabha
Goa LoksabhaDainik Gomantak

आठ वर्षीय बालकाचे अपहरण, बिहारच्या संशयिताला अटक

आठ वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणी संशयित फेको कुमार (मूळ बिहार) याला दहिसर-महाराष्ट्र येथून अटक. डिचोली पोलिसांची कारवाई. आमोणे येथून अपहरण केलेल्या बालकाची सुटका.

Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

स्मार्ट पणजीत मतदान केंद्रात 'नो चेंज'  - जिल्हाधिकारी

पणजी स्मार्ट सिटीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी मतदारांना मतदान केंद्रात जायला कसलीच अडचण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या काम सुरू असूनही कुठल्याच मतदान केंद्रात बदल केला नसल्याचे जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

Goa Loksabha
Goa LoksabhaDainik Gomantak

मोर्ले सत्तरीत काजू बागायतीत आग

Sattari Fire News

मोर्ले सत्तरी येथील रावण मार्गावर दुपारी (दि. 18 मार्च) काजू बागायतीमध्ये असलेल्या सुक्या गवताला आग. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण.

Goa Fire
Goa FireDainik Gomantak

दक्षिण गोव्यासह भाजपचे उमेदवार आज ठरणार

दक्षिण गोव्यासह भाजपचे उर्वरीत उमेदवार आज (सोमवार) जाहीर होणार आहेत. यासाठी भाजच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक दिल्लीत होत आहे.

फसवणूक प्रकरण! चार वर्षापासून फरार 'बेगारी'ला अटक

फसवणूक प्रकरणातील चार वर्षापासून फरार भास्कर बेगारी याला अटक. फातोर्डा पोलिसांनी संशयित बेगारी याला मियापूर हैद्राबाद येथून घेतले ताब्यात. बेगारी 2020 पासून फरार होता.

Fatorda Police
Fatorda PoliceDainik Gomantak

उस्ते सत्तरी येथे अपघातात एकजण ठार

Ustem Sattari Accident

उस्ते सत्तरी येथे अपघातात दीपक रामा गावकर (३९) जागीच ठार. वीज खांबाला दुचाकीची धडक बसल्याने झाला अपघात.

Ustem Sattari Accident
Ustem Sattari AccidentDainik Gomantak

मडगाव भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला

Margao Crime

मडगाव भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला. डोक्यात हेल्मेट घालून घटनास्थळावरून काढला पळ. पोलिस तपास सुरु.

Margao Crime
Margao CrimeDainik Gomantak

रायबंदर ते दिवाडी दरम्यान चालणाऱ्या फेरी बोटीच्या इंजिनला आग

Ribandar Divar Ferry Boat

रायबंदर ते दिवाडी दरम्यान चालणाऱ्या फेरी बोटीच्या इंजिनला आग. कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण. कोणतीही जीवितहानी नाही. आज (दि.१८) सकाळची घटना.

Ribandar Divar Ferry Boat
Ribandar Divar Ferry BoatDainik Gomantak

महिला पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ, एकाविरुद्ध गुन्हा

Baina Crime

कर्तव्यावर बजावत असणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाबोळी विमानतळ पोलिसांकडून बायणा येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल. पोलिस निरीक्षक सुषमा नाईक यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद.

FIR
FIRDainik Gomantak

दोघांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू

Canacona

भाटपाळ-काणकोण येथे झालेल्या दोघांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू. संतोष रेवणकर (रा. पैंगीण) असे मृत व्यक्तीचे नाव असून, जखमी रोहन नाईक यांना उपचारासाठी मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Crime
Crime Dainik Gomantak

धारगळमध्ये पॅट्रोलपंपवर खोट्या नोटा देऊन कारचालक फरार!

Dhargal- Pernem

धारगळ येथे पॅट्रोलपंपवर 500 रुपयांच्या खोट्या नोटा देऊन कारमध्ये पॅट्रोल भरत चालकाचे पलायन. सीसीटीव्हीत प्रकार कैद. या पाचशेच्या 4 खोट्या नोटांवर भारतीय बच्चोंकी बॅंक असा उल्लेख.

Dhargal News
Dhargal NewsDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com