Goa Today's News Update: दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Goa And Konkan Live Online News Update in Marathi 22 March 2024: गोव्यातील विविध क्षेत्रातील ठळक घडमोडींचा आढावा.
Goa Today's Online News Update
Goa Today's Online News UpdateDainik Gomantak

दुचाकी चोरी प्रकरणी परप्रांतियाला अटक

स्कूटर चोरी प्रकरणी मुनीर मत्तूर (वय 36 वर्षे, सध्या रा. सिनेमा अलंकारनजीक म्हापसा, मूळ कर्नाटक) याला म्हापसा पोलिसांनी अटक केलीय.

काणकोण समुद्रात बुडून लंडनच्या पर्यटकाचा मृत्यू

Tourist Drowned

काणकोण येथील तळपोणा समुद्रात बुडून लंडनच्या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. विजय दासवानी (72) असे मृत पर्यटकाचे नाव असून, त्याचा मृतदेह मडगाव येथील शवागृहात पाठविण्यात आला आहे.

CM सावंत यांची पाच वर्ष; क्रशर, कोरी युनियनकडून अभिनंदन

अखील गोवा क्रशर आणि कोरी युनियनचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी संदेश नाईक, आशिष झारापकर, वैभव तांबा यांनी सगल 5 वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल केले डॉ. प्रमोद सावंतांचे अभिनंदन.

भाजपच्या चौथ्या यादीतही दक्षिण गोवा उमेदवार नाही!

BJP South Goa Candidate

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर. चौथ्या यादीतही दक्षिण गोव्याचा उमेदवार जाहीर करण्यास भाजपला अपयश.

गोवा विधानसभा निवडणुकीतील 'आप'च्या खर्चाची चौकशी करा - आमोणकर

Goa AAP

आपने गोवा विधानसभा निवडणुकीत केलेल्या खर्चाची चौकशी करा, अशी मागणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी यतिश नाईक यांनी केली आहे.

लोकसभा आदर्श आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी मांद्रे पोलिसांत एक गुन्हा

Goa Police

लोकसभा आदर्श आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी मांद्रे पोलिसांत आयपीएस १८८ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्यातील सराईत गुन्हेगारांवर पोलिस लक्ष ठेऊन असल्याचे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल म्हणाले.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल

ओर्डा-कांदोळीत दोन गटात हाणामारी, तिघेजण गंभीर जखमी

Orda, Candolim Assault Case

ओर्डा-कांदोळी येथे गुरुवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या हाणामारीत तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. तीन जणांना चार जणांच्या ग्रुपने त्यांना मारहाण केली.

यात मिथुन पवार, अजित राठोड आणि अशोक चौहान गंभीर जखमी झाले आहेत.

Orda, Candolim Assault Case
Orda, Candolim Assault CaseDainik Gomantak

अवैध मद्य बाळगल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांकडून मुंबईच्या एकाला अटक

Konkan Railway

कोकण रेल्वे पोलिसांकडून जयेश तांडेल (दहिसर, मुंबई) याला अवैध मद्य बाळगल्याप्रकरणी अटक. 61 लिटर 380 मिली 8,806 रुपये किमतीचे मद्य जप्त.

Konkan Police
Konkan PoliceDainik Gomantak

दोडामार्ग सत्तरीत हत्तींकडून शेती बागायतीतील पिकांचे नुकसान

दोडामार्ग सत्तरीत हत्तींकडून शेती बागायतीमधील केळी, पोफळी पिकांचे उद्ध्वस्त, लोखांचे नुकसान. दिवसा ढवळ्या जनावरांचा वावर, सरकारने त्वरीत बंदोबस्त करण्याची संतोष मोरये यांची मागणी.

Morlem Sattari
Morlem SattariDainik Gomantak

थिवी सरपंचपदी व्यंकटेश शिरोडकर

Thivim village panchayat

थिवी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी व्यंकटेश शिरोडकर यांची बिनविरोध निवड. या पंचायत मंडळाच्या सत्ताधारी गटात फूट पडल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. निवडणुकीवेळी विरोधी गटातील पाच पंचसदस्य राहिले गैरहजर.

Thivim village panchayat
Thivim village panchayatDainik Gomantak

अरविंद केजरीवाल अटक, गोव्यात आप कार्यकर्त्यांकडून निषेध

Goa Aam Aadmi Party

कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गोव्यात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रवींद्र भवन, मडगाव येथे निषेध करण्यात आला.

Goa Aam Aadmi Party
Goa Aam Aadmi PartyDainik Gomantak

मडगाव सर्व्हेअर मारहाण प्रकरण; संशयित आरोपी लंडनला फरार

मडगाव भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्य सर्व्हेअर प्रसाद सावंत देसाई यांना मारहाण करणारा संशयित आरोपी सॅव्हियो ऑलविन गोम्स लंडनला फरार झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com