Goa News: हरवळे पंचायत निवडणूकीत 91.17 टक्के मतदान; वाचा दिवसभरातील घडामोडी

Harvalem Panchayat voting turnout: हरवळे पंचायतीच्या चार प्रभागांमध्ये एकूण 91.17 टक्के मतदान. संध्याकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया बंद.
vote
voteDainik Gomantak
Published on
Updated on

हरवळे पंचायत निवडणूकीत 91.17 टक्के मतदान

हरवळे पंचायतीच्या चार प्रभागांमध्ये एकूण 91.17 टक्के मतदान. संध्याकाळी 5 वाजता मतदान प्रक्रिया बंद. सर्वाधिक मतदान प्रभाग क्र. 2 मध्ये (95.58) तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्र. 3 मध्ये (83.38) झाले.

'तेजस्विनी'ची तेजस्वी कामगिरी! गोव्याच्या महिला संघाचा मुंबईवर सनसनाटी विजय

तेजस्विनी दुरगडच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर गोव्याने वरिष्ठ महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत मुंबईवर एका विकेटने सनसनाटी विजय मिळवला. बडोदा येथे हा सामना झाला.

आपल्यातील कौशल्य ओळखा, स्वावलंबी बना; मुख्यमंत्र्यांचे राज्यातील युवाशक्तीला आवाहन!

केवळ नोकरीच्या मागे न लागता आज समोर असलेल्या विविध क्षेत्रांतील व्यवसायिक संधीचा लाभ घेत स्वावलंबी बना. आपल्यातील कौशल्य गुण ओळखून त्या दृष्टीने क्षेत्र निवडा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे युवा सशक्तीकरण कार्यक्रमात आवाहन.

32व्या ज्युनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ ठरला उपविजेता!

हरियाणा येथील सोनीपत येथे झालेल्या 32व्या ज्युनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या मुलांचा संघ उपविजेता ठरला. अंतिम फेरीत गोवा संघ उत्तर प्रदेशकडून पराभूत झाला.

हरवळे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक; दुपारी 12 पर्यंत 56. 54 टक्के मतदान

हरवळे ग्रामपंचात निवडणूकीत दुपारी 12 पर्यंत 56.54 टक्के मतदान झाले आहे.

कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या नियोजित प्रकल्पाविरोधात कुडचिरेवासीय एकवटले!

कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या नियोजित प्रकल्पाला कुडचिरेत विरोध कायम. ग्रामस्थ पुन्हा एकवटले. ग्रामस्थांच्या एकजुटीसाठी संकल्प.

डोळ्यावर पट्टी नाही, खुल्लम खुल्ला, काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकरांचा हल्लाबोल!

"भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी चालू असलेले मंत्री सरन्यायाधीशांचे स्वागत करतात. दुसऱ्या दिवशी, भारताचे सरन्यायाधीश पक्षांतर करणारे मंत्री आणि आमदार यांच्यासोबत कार्यक्रमांत उपस्थित राहतात आणि गोव्यात सुरु असलेल्या विकासामुळे ते प्रभावित झाल्याचे वक्तव्य करतात. नेमके त्याच दिवशी, उच्च न्यायालय गोव्यातील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणाची स्वतःहून दखल घेत सरकारला नोटीस जारी करतात. एकंदर प्रकार पाहता डोळ्यावरची पट्टी काढून सर्वकाही खुल्लम खुल्ला करण्याचेच हे संकेत", काँग्रेस माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी हल्लाबोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com