Goa Top News: मोदींना लोकोत्सवाचे निमंत्रण, आसगाव घर मोडतोड प्रकरण; राज्यातील ठळक बातम्या

Goa Today's 02 July 2024 Live News: मॉन्सून, गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा, कला-संस्कृती यासह राज्यातील ठळक बातम्या.
लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदींना निमंत्रण
PM Modi And TawadkarDainik Gomantak

लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदींना निमंत्रण

सभापती रमेश तवडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत घेतली भेट. काणकोण येथे होणाऱ्या लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी त्यांना आमंत्रित केल्याची तवडकरांची माहिती. सभापतींची मोदींसोबत श्रमधाम, आदर्श युवा संघ आणि श्री बलराम शिक्षण संस्थेबाबत चर्चा.

आठव्या अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीतीवर चर्चा

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्टा, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई आणि आपचे आमदार कॅप्टन वेंझी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा यांची आठव्या विधानसभेच्या सातव्या अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बैठक.

गोव्याच्या विनाशावर भाजपचे मौन - युरी आलेमाव

गोव्याचे पर्यावरण, वन आणि वन्यजीव नष्ट झाले आहेत. म्हादईवर भाजपने तडजोड केली आहे. बेरोजगारी वाढली आहे, इंधनाचे दर आणि वीज दर परवडत नसलेल्या पातळीवर पण भाजप आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पूर्णपणे मौन बाळगून आहेत. भाजपने मूळ मुद्द्यांवरून लक्ष वळवणे थांबवावे, असे युरी आलेमाव म्हणाले.

पणजीत राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

दिल्ली संसदेत राहूल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पणजी येथे कॉंग्रेस हाऊस समोर त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. राहुल गांधीनी भारतीयांची माफी मागावी अशी मागणी भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

कोलवा पोलिस उपनिरीक्षकला तात्काळ निलंबित करुन चौकशी करा - व्हिएगस

आमदार वेंझी व्हिएगस यांनी घेतली दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांची भेट. महिलेला मारहाण करुन बूट चाटण्यास सांगणाऱ्या कोलवा पोलिस उपनिरीक्षकला तात्काळ निलंबित करुन चौकशीची व्हिएगस यांची मागणी. यापूर्वी एसपी सावंत यांनी आरोपांचे खंडन करत असे काही घडले नसल्याचा खुलासा केला होता.

Assagao House Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरणातील चार संशयितांना जामीन

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील संशयित कार चालक आश्फाक शेख बाऊन्सर शाहीन सौदागर, शालन मोर्लेकर आणि बिसमिल्ला गोरगुंदगी यांना प्रत्येकी एक जामिनदार व वीस हजार जातमुचलक्यासह जामीन मंजूर.

जन्मदात्रीचा स्वत: ला संपवण्यासह पोटच्या मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न

सुकूर पर्वरी येथे महिलेचा फिनेल प्राशन करून स्वत: ला संपवण्याचा व दोन मुलांनाही फिनेल पिण्यास लावून मारण्याचा प्रयत्न. याप्रकरणी पर्वरी पोलिसांकडून मुलांच्या आईविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल. मुलांवर गोमेकॉत तर आईवर खासगी इस्पितळात उपचार सुरू.

फिनेल घेऊन आईचा आत्महत्येसह मुलांचा जीवे मारण्याचा प्रयत्न

सुकूर पर्वरी येथे महिलेने स्वतः फिनेल प्राशन करून आत्महत्येचा व दोन मुलांनाही फिनेल पिण्यास लावून मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी मुलांच्या आईविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुलांवर गोमेकॉ इस्पितळात तर आईवर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

Kala Academy: कला अकादमीबाबत कलाकार आक्रमक; श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

कला राखण मांड समितीच्या वतीने सकाळी कला अकादमीसमोर गाऱ्हाणे मांडून नारळ फोडत आंदोलनास सुरुवात केली. कला अकादमीच्या निकृष्ट कामाबाबत कलाकारांनी नाराजी व्यक्त केली असून, श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

Pandharpur Wari 2024: मुख्यमंत्र्यांच्या हाती वीणा अन् चिपळ्या तर मिसेस मुख्यमंत्र्यांच्या डोईवर तुळस

आमोणा येथून पंढरपूर येथे पायी निघालेल्या ओम नमो ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाच्या वारीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निरोप दिला. मुख्यमंत्री स्वतः पत्नीसह वारीत सहभागी होत काही पावले चालून सेवा बजावली.

Goa Crime News: तरुणीचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी एकाला अटक

तरुणीचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी कुळे पोलिसांकडून संशयीत रवींद्र पुरसेकर (साकोर्डा) याला केली अटक. अधिक तपास सुरु.

Kala Academy: कला अकादमीबाबत कलाकार आक्रमक, आंदोलनास सुरुवात

'कला राखण मांड समिती'च्या वतीने कला अकादमीसमोर आज (०२ जुलै) नारळ फोडून आंदोलनास सुरुवात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून सविस्तर चर्चा करणार असल्याची आंदोलनकर्त्यांची माहिती.

Goa Accident: मोटारसायकल पायलट थोडक्यात बचावला!

पणजीतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या मेरी इमॅक्युलेट चर्च समोरील एका जीर्ण झाडाची फांदी कोसळली. यावेळी एक मोटरसायकल पायलट थोडक्यात बचावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com