Anjuna Police: सनबर्न फेस्टिव्हलमध्ये महागड्या मोबाईलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मुंबईतील सात जणांना अटक

Anjuna Police: हणजूण पोलिसांची कारवाई; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
Anjuna Police
Anjuna PoliceDainik Gomantak

Anjuna Police: '82 लाखांच्या पासेसची चोरी, दोघा युवतींची बिघडलेली प्रकृती, भगवान शिवाचा अपमान आणि फेस्टिवल मधील चोरी प्रकरण' या आणि अशा अजून काही घटनांनी गोव्यातील यंदाचा सनबर्न फेस्टिवल बराच गाजला.

नुकतेच हणजूण पोलिसांनी सनबर्न फेस्टिवलमध्ये महागड्या फोन्सची चोरी करण्याऱ्या 7 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला मोठ्या शिताफीने पकडून त्यांच्याकडून 25 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केलीय.

Anjuna Police
'सनबर्न बळजबरीने लादण्यात आलाय' गोवा कायद्याचे राज्य नसल्याचा हा स्पष्ट संदेश - काँग्रेस

सनबर्न फेस्टिव्हल सुरू झाल्यापासून पोलिसांकडे मोबाईल चोरीच्या अनेक घटनांची नोंद झाली होती. त्यामुळे हणजूण पोलीस या फेस्टिवलमध्ये चोरांच्या मागावर होते.

दरम्यान शनिवारी सकाळी पोलीसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातील हे सातही चोरटे पोलिसांच्या सापळ्यात अडकले.

हे सर्वजण मुंबई मुंब्रा येथील असून जप्तीदरम्यान त्यांच्याकडून विविध ब्रँडचे 29 हाय एंड मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

या जप्त करण्यात आलेल्या सर्व फोन्सची अंदाजे रक्कम 25 लाख एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या सर्वांना आयपीसी कलम 379 आर/डब्ल्यू 34 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

गोवा पोलिसांनी महाराष्ट्रातून पकडलेल्या टोळीतील आरोपींची नावे खालीलप्रमाणे:-

1. उबेदुल्ला रा. समिउल्ला खान, (वय 43 वर्षे, मुंब्रा रेल्वे स्टेशन, मुंबई)

2. ओवेझ (वय 31 वर्षे, मुंब्रा, मुंबई)

3. सोहेल उस्मान मेमन (वय 32 वर्षे रा/मुंब्रा मुंबई)

4. अब्दुल रहमान नियामाद अली खा (वय 44 वर्षे, मालाड पश्चिम महाराष्ट्र)

५. सद्दाम अली सत्तार अली सय्यद (वय 30 वर्षे, रा. वसई पूर्व महाराष्ट्र)

6. मोहम्मद झीशान नझीर खान (वय 21 वर्षे, मुंब्रा मुंबई)

7. सोहेल रा. इम्रान शेख (वय 22 वर्षे, कोपरी ठाणे)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com