'सनबर्न बळजबरीने लादण्यात आलाय' गोवा कायद्याचे राज्य नसल्याचा हा स्पष्ट संदेश - काँग्रेस

गोव्याच्या पर्यटनाचा दृष्टीकोन काय आहे? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.
Goa Congress On Sunburn
Goa Congress On Sunburn
Published on
Updated on

Sunburn: वादग्रस्त सनबर्न फेस्टिव्हल बळजबरीने गोव्यावर लादण्यात आला आहे, त्यावरून राज्यात कायद्याचे राज्य नसल्याचा स्पष्ट आणि चिंताजनक संदेश मिळतो, असे गोवा काँग्रेसने म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही पहिल्याच दिवशी सनबर्नने ध्वनी नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांनी केवळ एक स्टेज बंद केला. पण त्यानंतरही सोहळा मुक्ततेने चालू ठेवण्याची परवानगी दिली. बँड वितरणात एका कथित घोटाळ्यातही गंभीर वाद असून, सनबर्नच्या 5 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

गोव्याच्या भूमीवर सनबर्नसारख्या संशयास्पद कार्यक्रमांना परवानगी दिल्याने राज्याला काय फायदा होतो? असा सवाल गोवावासीयांकडून विचारला जात आहे. गोव्याच्या पर्यटनाचा दृष्टीकोन काय आहे? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.

अमली पदार्थांचा व्यापार, वेश्याव्यवसाय आणि इतर गंभीर गुन्हेगारी कारवायांचे केंद्र अशी राज्याची ओळख निर्माण झालीय, ज्यामुळे केवळ देशभरातीलच नव्हे तर जगभरातील अनिष्ट घटकांना आकर्षित केले जाते.

पर्यटन हंगाम शिखरावर असताना देखील गोवन शॅक मालकांना अद्याप परवाने दिलेले नाहीत. सनबर्नला मात्र प्रमोद सावंत सरकारने रेड कार्पेट वागणूक दिली.

गोव्यात भाजप सरकार असण्याचे हेच दु:ख आहे, गोवावासीयांना या गोव्याविरोधी सरकारच्या जंजाळातून मुक्त होण्याची वेळ आलीय, असे काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com