Goa Stray Cattle Issue: मोकाट गुरांची समस्या सोडवण्यासाठी लोकांचे सहकार्य हवे- नीळकंठ हळर्णकर

Goa Stray Cattle Issue: गोव्यात मोकाट गुरांची समस्या दूर करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री हळर्णकर यांनी केले.
Goa Stray Cattle
Goa Stray CattleDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Stray Cattle Issue: गो सेवा ही ईश्वर सेवा असून, मोकाट गुरांचे संगोपन करणाऱ्या संस्था पुण्यवान आहेत. सरकारही अशा संस्थांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी व्यक्त केले.

अखिल गोमंतक गौसेवक महासंघाच्या सिकेरी-मये येथील गोशाळेत आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. आजही राज्यात मोकाट गुरांची समस्या आहे,अशी खंत व्यक्त करून, ही समस्या दूर करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री हळर्णकर यांनी केले.

दरम्यान, यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, पशुसंवर्धन खात्याचे उपसंचालक डॉ. मारवीन लोपेस, स्थानिक पंच कृष्णा चोडणकर, भारत स्वाभिमानचे अध्यक्ष कमलेश बांदेकर, गोशाळेचे अध्यक्ष कमलाकांत तारी, सुभाष पार्सेकर, डॉ. राजेश केणी आदी उपस्थित होते. आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

डॉ. मारवीन लोपेस यांचा गौरवही करण्यात आला. कमलाकांत तारी यांनी स्वागत केले. तत्पूर्वी अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री हळर्णकर यांच्या हस्ते हळदणवाडी-मये येथील गोशाळेसाठी बांधण्यात आलेल्या गोठ्याचे (शेड) उद्‍घाटन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com