Goa Coconut: कसे वाढणार नारळांचे उत्पादन? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

तंत्रशुद्ध लगावडीवर भर दिला तर ही गरज पुर्ण होण्यात मदत होईल. – किशोर भावे, प्रोजेक्ट डायरेक्टर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी
Coconut tree
Coconut treeDainik Gomantak

नारळ हे गोव्याचे प्राचीन फळ आहे. सहाव्या शतकापासून इथे त्याच उत्पादन होत असल्याचा उल्लेख जुन्या दस्तऐवजांमध्ये मिळतो तसे पुरावे देखील मिळतात. गोमंतकीयांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग म्हणून ओळखला जातो. कोंकणी भाषेत नारळाला ‘नाल्ल’ असे म्हटले जाते.

किनारपट्टी भागातील लोकांच्या आहारात नारळाचा मोठ्याप्रमाणात उपयोग केला जातो. इथला प्रत्येक पदार्थ याच्याशिवाय पुर्ण होत नाही. गोवेकरांची आवडती ‘कढी’ देखील याच नारळापासून बनते. पण हल्ली काही वर्षांपासून या पिकामध्ये घट दिसून आला आहे.

Coconut tree
Bicholim Municipality: चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारात जाताय? थोडं थांबा, पोलिसांनी घेतला 'हा' निर्णय एकदा वाचा..

राज्यातील नारळांच्या पिक उत्पादनाबाबतीत कृषी क्षेत्रात उदासीनता दिसून येते. यामध्ये सासष्टी तालुका एक चतुर्थांश उत्पादन करत आघाडीवर आहे. त्यानंतर काणकोण, सांगे, मुरगाव, तिसवडी, बार्देश आणि पेडणे यांचा नंबर लागतो.

नारळाची लागवड ही शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवी. चांगल्या प्रतीचे कवाथे लागवडीसाठी निवडल्यास चांगल्या प्रतीचे पीक येण्याची शक्यता असते. खताचे व्यवस्थापन तसेच ठिबक सिंचन पद्धती वापरल्याने जास्त प्रमाणात उत्पादन होते कारण नारळाचे झाड पाण्याला खूप चांगला प्रतिसाद देते.

Coconut tree
Vijai Sardesai: कुठला पोलिस किती पैसे खातो, कुणाला हप्ता जातो.. याची यादी माझ्याकडे; जपून बोला अन्यथा...

हवामान बदलांचा थोडाफार परिणाम पिकांवर होऊ शकतो पण जर पिकपद्धती बदलली तर त्यावर तोडगा नीघू शकतो. रानटी जनावरांचा त्रास कमी करण्यासाठी फेन्सिंग, आवाज करणारी इलेक्ट्रोनिक उपकरणे किंवा एयर गन हे पर्याय असू शकतात ज्यामुळे त्यांचा त्रास पिकांवर होणार नाही असे तज्ञ म्हणतात.

गोव्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने इथल्या हवेत बाष्प आहे त्यामुळे साहजिकच नारळाच्या लागवडीसाठी हे हवामान अगदी पोषक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. जर शेतकाऱ्यांनी आपली पिकपद्धती थोडी बदलली तर उत्पादनात फायदा होऊ शकतो.

कुठल्याही प्रकारचे पीक जास्त प्रमाणात येण्यासाठी मातीमध्ये सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) प्रामुख्याने असणे गरजेचे आहे. त्यासाठी पारंपरिक पाधातीने लागवड करणाऱ्यांनी शेणखत, सावळ अशाप्रकारची खत भरपूर प्रमाणात झाडांना घालायला हवी जी सेंद्रिय कर्ब (Organic Carbon) निर्माण करतात.

बाणावली आणि कळंगुट या राज्यातील प्रमुख स्थानिक जाती असून गुणवत्तेच्या दृष्टीने त्या अतिशय चांगल्या आहेत. इतर जातींशी त्यांचा संकर केल्याने नारळाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

"सध्या राज्याला गरजे इतके नारळाचे उत्पादन होत नाही. सध्या होत असलेले ८० ते १०० नारळांचे सरासरी उत्पादन वाढवून २०० नारळापर्यन्त वाढवायला हवे तेव्हाच ते शेतकऱ्याला परवडू शकते. जर त्यांनी तंत्रशुद्ध लगावडीवर भर दिला तर ही गरज पुर्ण होण्यात मदत होईल."

किशोर भावे, प्रोजेक्ट डायरेक्टर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com