Premier League Cricket: चौगुले, जीनो क्लबचे शानदार विजय

Premier League Cricket: अनिर्णित निकालासह साळगावकर संघ अव्वल
Premier League
Premier LeagueDainik Gomantak

Premier League Cricket: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाच्या शर्यतीत कायम राखताना जीनो स्पोर्टस क्लबने मडगाव क्रिकेट क्लबला सात विकेट राखून हरविले.

चौगुले स्पोर्टस क्लबने लागोपाठच्या दोन पराभवानंतर धेंपो क्रिकेट क्लबला २३९ धावांनी नमवून स्पर्धेतील पहिल्या विजयाची चव चाखली, तर पणजी जिमखान्याविरुद्ध अनिर्णित लढतीत एक गुण मिळूनही साळगावकर क्रिकेट क्लबने सरस कोशंटवर अव्वल स्थान कायम राखले.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सामन्याच्या अखेरच्या आणि तिसऱ्या दिवशी धेंपो क्लबसमोर विजयासाठी २८७ धावांचे आव्हान होते.

फिरकी गोलंदाज कीथ पिंटो याच्यासमोर धेंपो क्लबचा दुसरा डाव १०८ धावांत आटोपला. कीथ याने सामन्यात ८० धावांत १० गडी बाद केले. त्याने पहिल्या डावात ३९ धावांत ५, तर दुसऱ्या डावात ४१ धावांत ५ गडी टिपले. चौगुलेच्या रोहन कदमने शतक ठोकले.

सांगे येथील जीसीए मैदानावर फिरकी गोलंदाज मोहित रेडकर (६-६१) व १६ वर्षीय समर्थ राणे (२-२६) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर जीनो क्लबने मडगाव क्रिकेट क्लबचा दुसरा डाव १२१ धावांत गुंडाळला आणि नंतर ४७ धावांचे विजयी लक्ष्य तीन विकेट गमावून गाठले.

चिखली-वास्को येथील मैदानावर शुभम देसाई (५-५४) व सत्यजीत बच्छाव (३-६९) यांच्या प्रभावी फिरकीमुळे पणजी जिमखान्याला पहिल्या डावात ७४ धावांची आघाडी मिळाली. साळगावकरतर्फे या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज सागर उदेशी याने १४२ धावांत १२ गडी (६-१२१ व ६-२१) टिपण्याचा पराक्रम साधला.

संक्षिप्त धावफलक

१) चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः १८६ व दुसरा डाव (२ बाद १८० वरून) ः ७१.३ षटकांत ५ बाद ३१९ घोषित (रोहन कदम १००, तुनीष सावकार ५२, राजशेखर हरिकांत ५४, आयुष वेर्लेकर नाबाद ५१, शुभम तारी ३-४३) वि. वि. धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः १५३ व दुसरा डाव ः २४.३ षटकांत सर्वबाद १०८ (कौशल हट्टंगडी ४३, पार्थ भूत २-३८, कीथ पिंटो ५-४१, मंथन खुटकर २-१७).

२) मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव २१५ व दुसरा डाव (२ बाद २६ वरून) ः ४४ षटकांत सर्वबाद १२१ (कौस्तुभ पिंगुळकर २३, समर्थ राणे ३-२६, मोहित रेडकर ६-६१) पराभूत वि. जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः २९० व दुसरा डाव ७.२ षटकांत ३ बाद ५०.

३) पणजी जिमखाना, पहिला डाव ः ३३६ व दुसरा डाव ः ३९ षटकांत ८ बाद १६९ घोषित (महंमद अर्स्लान खान ३५, शिवेंद्र भुजबळ ३३, सागर उदेशी ६-२१) अनिर्णित विरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव (७ बाद २३३ वरून) ः ८३ षटकांत सर्वबाद २६२ (शुभम देसाई ५-५४, सत्यजीत बच्छाव ३-६९) व दुसरा डाव १८ षटकांत बिनबाद ५५ (आर्यन नार्वेकर नाबाद ३३, प्रथमेश गावस नाबाद २१).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com