I-League Football: चर्चिल ब्रदर्सला नमविल्याने मोहम्मेडनचे अग्रस्थान बळकट

I-League Football: सामना मंगळवारी रात्री पश्चिम बंगालमधील नैहाटी बंकिमनजली स्टेडियमवर झाला.
I-League Football
I-League FootballDainik Gomantak

I-League Football: आय-लीग फुटबॉल स्पर्धा प्रथमच जिंकण्याच्या स्थितीत असलेल्या कोलकात्याच्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबने पिछाडीवरून गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला 3-2 असे निसटते हरविले आणि अग्रस्थान बळकट केले.

सामना मंगळवारी रात्री पश्चिम बंगालमधील नैहाटी बंकिमनजली स्टेडियमवर झाला. मोहम्मेडनसाठी एडी हर्नांडेझ (28 व 32वे मिनिट) याने दोन, तर लालरेमसांगा फनाई (75वे मिनिट) याने एक गोल केला.

चर्चिल ब्रदर्सतर्फे स्टेन्डली फर्नांडिस (10 वे मिनिट) व मार्टिन चावेस (51वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

मोहम्मेडन स्पोर्टिंगने 19 व्या सामन्यात 13 वा विजय नोंदवून 44 गुणांसह अग्रस्थान भक्कम केले. दुसऱ्या क्रमांकावरील श्रीनिदी डेक्कनपेक्षा (36 गुण) त्यांचे आठ गुण जास्त आहेत.

चर्चिल ब्रदर्सला आठवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 19 लढतीनंतर त्यांचा 23 गुणांसह सातवा क्रमांक कायम राहिला.

I-League Football
Illegal Construction: ...अखेर वाळपईतील खान यांच्या बंगल्यावर प्रशासनाचा हातोडा; बंगला जमीनदोस्त करण्यास 4-5 दिवस लागणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com