Indian Super League: ‘आयएसएल शिल्ड’साठी चुरस वाढली

Indian Super League: मुंबई सिटी, मोहन बागान, एफसी गोवा, ओडिशा संघात चढाओढ
Indian Super League
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League: एफसी गोवा संघाने बंगळूर एफसीवर मात केल्यानंतर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ‘शिल्ड’साठी चुरस कमालीची वाढली. साखळी फेरीत अव्वल ठरण्यासाठी आता चार संघांत चढाओढ आहे.

मुंबई सिटी, मोहन बागान सुपर जायंट्स, एफसी गोवा आणि ओडिशा एफसी या संघांचा सध्या ‘शिल्ड’साठी दावा आहे.

मुंबई सिटी व मोहन बागानचे प्रत्येकी ३९, एफसी गोवाचे ३६, तर ओडिशाचे ३५ गुण आहेत. हे चारही संघ प्ले-ऑफ फेरीसाठी पात्र ठरले असून बाकी दोन संघ कोणते असतील याची उत्सुकता आहे.

केरळा ब्लास्टर्स २९ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. मागील पाच लढतीत फक्त एक विजय नोंदविल्यामुळे केरळमधील संघाला शिल्ड जिंकण्याची संधी नाही.

प्रत्येकी २१ गुण असलेले जमशेदपूर एफसी, पंजाब एफसी, बंगळूर एफसी, तसेच २० गुण असलेला नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यापैकी एक संघ सहावा क्रमांक मिळवून प्ले-ऑफ फेरी गाठू शकतो.

प्रत्येकी १८ गुण असलेले ईस्ट बंगाल व चेन्नईयीन एफसी हे संघही सहाव्या क्रमांकासाठी प्रयत्नशील असतील. फक्त तळाच्या १२व्या स्थानी असलेला हैदराबाद एफसी संघ प्ले-ऑफमधून बाहेर पडलेला एकमेव संघ आहे.

Indian Super League
Goa Mines: खाणीला अडवलपालवासीयांचा विरोध; मात्र अपेक्षेप्रमाणे विरोधाची ‘धार’ नाहीच

एफसी गोवा संघ दावेदार

आयएसएलमध्ये सलग १२ सामने अपराजित राहिल्यानंतर एफसी गोवाची कामगिरी दुसऱ्या टप्प्यात खालावली. सात सामन्यांतून त्यांनी फक्त आठ गुण प्राप्त केले.

त्यामुळे त्यांची गुणतक्त्यात घसरण झाली, मात्र घरच्या मैदानावर फातोर्ड्यात ईस्ट बंगाल व बंगळूरला नमविल्यामुळे आता त्यांचे वरच्या क्रमांकावरील मुंबई सिटी व मोहन बागानच्या तुलनेत फक्त तीन गुण कमी आहेत.

एफसी गोवाचे पुढील तीन सामने गुणतक्त्यात खालच्या क्रमांकावर असलेल्या संघाविरुद्ध आहेत. त्यांचा पाच एप्रिल रोजी फातोर्ड्यात हैदराबाद एफसीविरुद्ध, नऊ एप्रिलला जमशेदपूर एफसीविरुद्ध अवे मैदानावर, तर १४ एप्रिल रोजी चेन्नईयीन एफसीविरुद्ध फातोर्ड्यात सामना होईल.

‘‘आमचा संघ चांगला खेळू लागलाय. आम्हाला आता थोडी विश्रांती आहे. त्यानंतर पुढील वाटचाल असेल. आम्ही कुठे असणार हे पाहुया.

पुढील सामना हैदराबादविरुद्ध आहे. त्या लढतीत आम्हाला तीन गुण मिळवावे लागतील. त्यानंतर बाकी लढतींत काय होते हे पाहावे लागेल. कामगिरी चोख बजावणे आवश्यक असून इतर बाबींवर आम्ही नियंत्रण राखू शकत नाही.’’

- मानोलो मार्केझ, एफसी गोवाचे प्रशिक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com