Goa Session Court : ड्रग्ज संशयित नायजेरियनची मालमत्ता गोठविण्‍याच्‍या आदेशावर शिक्कामोर्तब

अंमलीपदार्थविरोधी कक्षाने ६७ लाखांचे ड्रग्ज जप्त
Sessions Court |Goa News
Sessions Court |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drugs Case: गेल्या महिन्यात अंमलीपदार्थप्रकरणी अटक करण्यात आलेला नायजेरियन नागरिक संडे ओन्ये लकी याच्यासह त्याच्या पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता अंमलीपदार्थविरोधी कक्षाने जप्त केली होती.

यासंदर्भातील माहिती मुंबईच्या ‘सफेमा’ न्यायालयाला दिली होती. या न्यायालयाने अंमलीपदार्थविरोधी कक्षाने जप्त केलेली मालमत्ता गोठवण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केल.

तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची प्रशंसाही केली आहे. गोवा पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षाने गेल्या जून महिन्यात नायजेरियन नागरिक असलेल्या लकी आणि त्याच्‍या गोव्यातील पत्नीची जवळपास एक कोटीची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला होता.

अंमलीपदार्थांच्या व्यापारातून एक कोटी रुपये मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. आरोपी नायजेरियन नागरिकाला गेल्या वर्षी एका छाप्यावेळी अटक करण्यात आली होती, जिथे अंमलीपदार्थविरोधी कक्षाने ६७ लाखांचे ड्रग्ज जप्त केले होते.

Sessions Court |Goa News
Goa Assembly Monsoon Session : लोकप्रतिनिधींविरोधात 135 गुन्हे; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

पोलिस अधीक्षक शिवेंदू भूषण (आयपीएस) यांच्या नेतृत्वाखाली कक्षाने या दाम्‍पत्‍याच्‍या मालमत्तेची तपासणी केली. त्यानंतर कक्षाने हे प्रकरण सक्षम प्राधीकरण, स्मगलर्स आणि फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर्स (जप्ती मालमत्ता) कायदा, १९७६ मुंबईकडे पाठविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com