Dabolim Airport: दाबोळी विमानतळ ‘फनेल’ क्षेत्रातील 81 बांधकामांचे अर्ज निकाली काढा

खंडपीठाचे निर्देश : नगरनियोजन मंडळाला तीन महिन्यांची मुदत
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak

Dabolim Airport : दाबोळी विमानतळाच्या फनेल क्षेत्रातील बांधकामे हटवण्याचा आदेशाविरोधात ८१ मालकांनी सादर केलेले आव्हान अर्ज तीन महिन्यांत निकालात काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नगरनियोजन मंडळाला दिले. पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार आहे.

जी बांधकामे दाबोळी विमानतळाच्‍या फनेल क्षेत्रात येतात, ती सर्व हटवण्याचे निर्देश मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाने दिले होते.

त्यास बांधकाममालकांनी न्‍यायालयात आव्‍हान दिले होते. या निर्देशाची प्रत मंडळाला सुपूर्द करण्यात येणार आहे. ज्या बांधकाममालकांनी आव्हान दिलेले आहे, त्यांचे अर्ज लवकरात लवकर म्हणजे तीन महिन्यांत निकाली काढावे असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सदर बांधकामांविरोधात चिखली पंचायतीने कोणतीच पावले उचलली नसल्याने सरपंच व सचिवांना सुनावणीवेळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार न्यायालयात हजर राहून त्‍यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.

Dabolim Airport
Goa Assembly : कोकणी समजत नाही मराठीत सांगू? मच्छीमार्केटवरून सरदेसाई आक्रमक Vishwajit Rane |

विशेष म्‍हणजे या बांधकामात सरपंचाचेही बांधकाम आहे. त्‍यामुळे त्‍यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र सरपंचांचा समावेश होत असल्याने पंचायतीने ही नोटीस मागे घेतली होती.

दरम्‍यान, कोणत्याच न्यायालयाने स्थगिती आदेश न दिलेली तसेच आव्हान न दिलेली सर्व बांधकामे पाडण्यात आल्‍याची माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्यायालयाला दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com