Goa Rain Update: फोंड्यात पावसाचे 'धूमशान'! सप्तकोटेश्वर मंदिरात शिरले पाणी; महादेवाचे मंदिरही पाण्यात बुडाले

Ponda, Saptakoteshwar Temple: फोंड्यात सकाळपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे फोंडा तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
Goa Rain Update: फोंड्यात पावसाचे 'धूमशान'! सप्तकोटेश्वर मंदिरात शिरले पाणी; महादेवाचे मंदिरही पाण्यात बुडाले
Ponda, Saptakoteshwar TempleDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Rain Update: फोंड्यात सकाळपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे फोंडा तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेले तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या. फोंड्यातील सप्तकोटेश्वर मंदिरातही पावसाचे पाणी शिरले. गेल्या वर्षीसुद्धा या मंदिरात पाणी भरले होते. तसेच, कोने-प्रियोळ येथे मुख्य रस्त्यावरच दरड कोसळली तर बेतोडा तिठ्यावर दरड कोसळून नवीनच बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळली.

ओपा-खांडेपार येथे दरड कोसळल्याने भला मोठा दगड रस्त्यावर आला. नागझर-कुर्टीतील महादेव मंदिर पावसाच्या पाण्यात अर्धे बुडाले. या ठिकाणी असलेली महादेवाची पिंडी पाण्याखाली गेली. येथील नाल्याला पूर आल्यामुळे हे पाणी मंदिरात शिरले.

Goa Rain Update: फोंड्यात पावसाचे 'धूमशान'! सप्तकोटेश्वर मंदिरात शिरले पाणी; महादेवाचे मंदिरही पाण्यात बुडाले
Goa Rain Update: पाऊस ओसरला, पण धोका कायम! हवामान खात्याकडून 'ऑरेंज अलर्ट'; धारगळीत महामार्गावर दरड कोसळली

तसेच, कवळे येथील शांतादुर्गा देवस्थानसमोरील रस्ता पाण्याखाली गेला. शेतीतील पाणी रस्त्यावर आल्याने हा रस्ता अखेर बंद करण्यात आला. ओपा-खांडेपार रस्त्यावर दरड कोसळल्याने भला मोठा दगड रस्त्यावर येऊन पडला. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. फोंडा भागात काही ठिकाणी तर माशेल, खांडोळा, वेरे आदी भागात वीजपुरवठा खंडित झाला, तो नंतर सुरळीत करण्यात आला.

Goa Rain Update: फोंड्यात पावसाचे 'धूमशान'! सप्तकोटेश्वर मंदिरात शिरले पाणी; महादेवाचे मंदिरही पाण्यात बुडाले
Goa Rain Update: राज्यात पावसाचा जोर मंदावला; सरासरी तुलनेत 7 टक्क्यांनी घट

प्रियोळात रस्ता बंद

फोंडा (Ponda) - पणजी महामार्गावरील कोने - प्रियोळ येथे सकाळी दहाच्या सुमारास दरड कोसळली. मातीसह झाडे रस्त्यावर कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी (Transport) बंद झाला. त्यानंतर वाहतूक म्हार्दोळ-फर्मागुढी रस्त्याने तसेच प्रियोळ-फर्मागुढी रस्त्याने वळवण्यात आली.

रस्त्यावर पडलेली माती आणि झाडे हटवण्यासाठी अग्निशामक दल तसेच पोलिस व इतर यंत्रणेसह नागरिकांनीही केले सहकार्य. दरम्यान, बेतोडा तिठ्यावर नवीनच बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. या ठिकाणी दरड कोसळल्याने ही भिंत कोसळली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com