Morjim School : मराठी धडे शिका, मराठी शाळांची नाळ तोडू नका!

प्राथमिक चौथीपर्यंत मराठी धडे घेतले तरच पुढील शिक्षण घेत असताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत.
Mahabaleshwar Samant
Mahabaleshwar Samantdainik gomantak

Morjim School : आपल्या गावातील ज्या मराठी शाळा आहेत, त्या मराठी शाळा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना त्या शाळेमध्ये घालावे. प्राथमिक चौथीपर्यंत मराठी धडे घेतले तरच पुढील शिक्षण घेत असताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत.

त्यासाठी प्रत्येकाने मराठीची कास धरून आपल्या गावातील प्राथमिक शाळा बंद पडू देणार नाही, अशीही प्रतिज्ञा करूया, असे आवाहन माजी शिक्षक महाबळेश्वर सामंत यांनी केले.

तांबोसे येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते महादेव गावकर यांच्यातर्फे मोफत छत्र्या, वह्या वितरित करण्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने सामंत बोलत होते. तांबोसे येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये श्री निहिरा प्रकाशनद्वारे बुधवार, १२ रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Mahabaleshwar Samant
Morjim News : मोरजीत स्थानिक पंच सदस्य विलास मोरजे यांनीच बुजवले रस्त्यांवरील मोठे खड्डे

यावेळी व्यासपीठावर साधना प्रकाशन संस्थेच्या साधना तांबोसकर, माजी सरपंच तथा विद्यमान पंचसदस्य दयानंद गवंडी, पालक-शिक्षक संघ अध्यक्ष रेश्‍मा आसोलकर, मुख्याध्यापिका स्मिता आंबेकर आदी उपस्थित होते.

Mahabaleshwar Samant
Morjim News: मोरजीतील भूमिका मंदिर देवस्थानच्या विहरीत पडला रेडा

आपल्याला यश मिळावे म्हणून प्रयत्न करावेत, अपयशातून खचून जाऊ नये. आपल्या संस्कार हे केवळ मराठीतूनच दिले जातात, याचे भान ठेवा. मराठी माध्यमातून ज्यांनी ज्यांनी शिक्षण पूर्ण केले ते यशवंत झाले. त्यांच्याकडे चांगले संस्कार आले. मराठी शिक्षण घेताना कोणीही कमीपणा मानू नये.

- महाबळेश्वर सामंत, माजी मुख्याध्यापक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com