Power Outages In Ponda: पावसाळा ओसरत आला तरी फोंडावासियांची डोकेदुखी काही सरेना, खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त

नागरिकांची त्रेधातिरपीट : गणेशचतुर्थीच्या काळात तरी वीज पुरवठा सुरळीत व्हावा
Power Cut Issue in Ponda
Power Cut Issue in PondaDainik Gomantak

Power Outages In Ponda: फोंडा येथे विजेचा लपंडाव सुरूच आहे. पावसाळा ओसरत आला तरी वीज पुरवठ्यात कोणती सुधारणा झालेली नाही. गणेश चतुर्थीच्या काळातही लोकांना या समस्येचा सामना करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.

सध्या सगळे कारभार वीज पुरवठ्यावर अवलंबून असतात. वीज पुरवठा खंडित झाला की बरेच नुकसान सोसावे लागते. रात्री वीज जात असल्यामुळे लोकांच्या झोपेवर परिणाम होतो. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना मोठी समस्या होते.

दुरुस्तीच्या नावाखाली वीज कर्मचारी काम करताना दिसत असले तर त्याचा आवश्‍यक परिणाम मात्र दिसून येत नाही. दुरुस्तीच्या नावाखाली हे कर्मचारी नेमके काय करतात याबाबत लोक आता संशय व्यक्त करू लागले आहेत.

वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच व्यावसायिकांची धांदल उडताना दिसत आहे. व्यवसाय, धंद्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. तक्रार दिल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळतात, अशी ग्राहकांची तक्रार आहे.

त्यामुळे ग्राहकांनी जावे कोठे असा प्रश्‍न निर्माण होत आहे. एकीकडे वीज दरात भरमसाट वाढ झाली असली तरी सेवेत मात्र कोणती सुधारणा झालेली दिसत नाही. चतुर्थीच्या काळात तरी वीज पुरवठा सुरळीत असावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Power Cut Issue in Ponda
Bicholim Municipality: चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारात जाताय? थोडं थांबा, पोलिसांनी घेतला 'हा' निर्णय एकदा वाचा..

फोंड्यातील वीज विभाग निष्काळजी बनला आहे. या विभागाला ग्राहकांच्या सोयीची पर्वाच नाही. पावसाळ्यात वीज जात होती तेव्हा वीज कर्मचारी पावसाला जबाबदार धरत होते. आता पाऊस कमी होऊन बरेच दिवस झाले असले तरी काही सुधारणा नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित वीजपुरवठ्यामुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत.

प्रशिल शेट पारकर, ग्राहक, फोंडा

विद्युत उपकरणे निकामी

वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने विजेवर चालणाऱ्या उपकरणे निकामी होण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा उद्योग, व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे. घरातील उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने लोकही संतप्त आहेत.

बाप्पाला साकडे

गणेश चतुर्थी काळात वीज पुरवठा सुरळीत राहू दे, यासाठी गणेशभक्त आतापासूनच बाप्पाला साकडे घालू लागले आहेत. परंतु सरकारी पातळीवर अद्याप विशेष कोणतीच हालचाल दिसत नसल्याने गणेशभक्त निराश आहेत. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालणे आवश्‍यक आहे. अन्यथा लोकभावना कधीही भडकू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com