सिकेरीच्या 'त्या' हॉटेलमध्ये रिक्रिएट होणार घटनाक्रम, CEO सूचनाचा पतीही गोव्यात येणार

सूचना पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी म्हटले आहे.
Candolim Murder Case
Candolim Murder Case

Candolim Murder Case: गोव्यासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या चार वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत. संशयित आई सूचनाला अटक केल्यानंतर तिला म्हापसा न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासाचा भाग म्हणून सिकेरीत हत्या घडलेल्या त्या हॉटेलमध्ये पोलीस संपूर्ण घटनाक्रम रिक्रिएट करणार आहेत. पण, सूचना पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सिकेरीत गुन्हा घडलेल्या हॉटेलमध्ये 06 आणि 07 जानेवारीला नेमकं काय घडलं? याचा घटनाक्रम पोलीस रिक्रिएट करणार आहेत. पण, सूचनाने घटनास्थळी जाण्यास नकार दिला. सकाळपासून सूचनाला घटनास्थळी घेऊन जाण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी सूचनाला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी कळंगुट पोलीस घेऊन गेले. पण, तिने घटनास्थळी जाण्यास नकार दिला. मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने सूचना नकार देत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, सूचनाच्या बॅगेमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून, तो फाटलेल्या अवस्थेतील टीश्‍यू पेपर आहे. चिठ्ठीत सूचनाने मुलाच्या कस्टडी तसेच तिचे व पती व्यंकटरमणमधील नात्याबाबत लिहिल्याचे समोर आले आहे.

सूचनाच्या पतीला समन्स

तपासाचा भाग म्हणून सूचनाचा पती व्यंकटरमण याला पोलिसांनी समन्स बजावले असून, व्यंकटरमण शनिवारी गोव्यात येण्याची शक्यता आहे. कामानिमित्त जकार्ता येथे असलेले व्यंकटरमण यांनी शवविच्छेदनानंतर मृत मुलावर अंत्यसंस्कार केले.

व्यंकटरमण यांच्याकडून तपासात आणखी काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com