Goa Police: पोलिसी वर्दीतल्या लढवय्याची गोष्ट !अशा प्रकारे कर्करोगावर केली मात

कर्करोगातून बरे झालेले आपली दिनचर्या व नियमित व्यायाम करून इतर रुग्णांना प्रोत्साहन व स्फूर्ती देणारे पोलिस खात्यातील आयपीएस अधिकारी निधीन वाल्सन.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police: एकेकाळी कर्करोगाचा (कॅन्सर) आजार झाला तर उपाय नाही असा समज जनतेमध्ये होता. मात्र, आता योग्य उपचार आणि जिद्द, इच्छाशक्ती व प्रबळ शिस्तीद्वारे कर्करोगावर मात करता येते, हे अनेकांनी दाखवून दिले आहे.

कर्करोगातून बरे झालेल्या आपली दिनचर्या व नियमित व्यायाम करून इतर रुग्णांना प्रोत्साहन व स्फूर्ती देणारे पोलिस खात्यातील आयपीएस अधिकारी निधीन वाल्सन.

वाल्सन धावताना श्‍वास घेण्यास त्रास व्हायचा. मात्र, त्यांनी त्यावर मात करून आज ते पोलिस खात्यात उत्तर गोवा जिल्हा पोलिस व क्राईम ब्रँच ही दोन्ही पदे कोणताही ताण न घेता यशस्वीपणे सांभाळत आहेत. नेहमीच्या कामातून थकून भागून घरी परतले तरी ते पहाटे उठून त्यांची योगा व व्यायामाची दिनचर्चा सुरू होते.

त्यांनी आपल्या पोलिस सहकाऱ्यांनाही त्याचा अनुभव दिला आहे व आता ते लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. त्‍यांचे हे प्रयत्न इतरांनी कॅन्सर दिनानिमित्त स्वीकारण्याची गरज आहे.

योगा व व्यायामाचा उपक्रम सुरू

अधीक्षक निधीन वाल्सन यांनी हल्लीच काही महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या आयर्नमॅन 70.3 या आव्हानात्मक अशा शर्यतीत भाग घेतला. पोहणे, सायक्लिंग, धावणे हे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्‍यक आहे.

त्यानी ही शर्यत वेळेपूर्वीच पूर्ण केली व ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे समाधानही ही शर्यत पूर्ण केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर होते. नेहमीच हरहुन्नरी असलेले हे पोलिस अधिकारी गोव्यातील लोकांशी संपर्क वाढवून मित्रत्वाचे नाते वाढवण्याबरोबरच आता पोलिस स्थानकामार्फत योगा व व्यायामाचा उपक्रम सुरू केला आहे.

हल्लीच जुने गोवे चर्च परिसरात त्यांनी या उपक्रमाची सुरुवात केली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

Goa Police
Goa News: ठराविक दिवशी रात्री 12 पर्यंत वाजवा म्युझिक!

तीन मोठमोठ्या जबाबदाऱ्या असूनही...

पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्याकडे तीन मोठमोठ्या जबाबदाऱ्या आहेत. मात्र, त्यातून खचून न जाता त्यांनी त्याला धैर्याने तोंड दिले,. एखादी व्यक्ती या आजारातून जात असताना काय करू शकते व कॅन्सरशी लढणे हा एक अशक्य आजार नाही, हे त्यांनी सर्वांना दाखवले.

या आजारातून बरे होणे अवघड असले तरी त्याविरुद्ध लढू शकता, पराभूत करू शकता व भविष्यात आणखी नव्या चांगल्या व आव्हानात्मक गोष्टी करू शकता हे त्यांनी दाखवून दिले आहे.

काहीही अशक्य नाही : वाल्सन यांना एका वर्षापूर्वी श्‍वास घेण्यास त्रास व्हायचा. 15 मिनिटे चालल्यावरही त्यांचे ह्रदयाचे ठोके सामान्य व्यक्तिपेक्षा दुप्पट व्हायचे. मात्र, या आजारावर उपचार करत व कॅन्सरशी लढा देत ते आता पूर्ण बरे झाले आहेत.

त्यांनी गेल्यावर्षी कठीण अशी आयर्नमॅन 70.3 शर्यत पूर्ण केली. तुमच्याकडे जिद्द, इच्छाशक्ती व शिस्त प्रबळ असेल तर काहीही शक्य आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com