Pravin Arlekar
Pravin Arlekar Dainik Gomantak

Pernem NhaiBag Junction: 'उड्डाणपूल होईपर्यंत सिग्नल बसवणार'; अपघात रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील - आर्लेकर

Pernem NhaiBag Junction: गोव्यातील रस्ते अपघातांची सत्र; उड्डाणपूलाच्या मागणीसह आमदारांचे आश्वासन
Published on

Pernem NhaiBag Junction: गोव्यात वाढते रस्ते अपघात हे वाहनचालकांसहित पादचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत.

मागील 3-4 दिवसात झालेल्या अपघातात 5 जणांचा बळी गेला. पोरस्कडे-न्हयबाग जंक्शनवर रविवारी झालेल्या अपघातात अजित वसंत च्यारी (वय 57) यांचा मृत्यू झाल्यावर 'रस्ते अपघात' या विषयाने पुन्हा एकदा उचल घेतली.

काल सोमवारी याच विषयासंबंधी काँग्रेसचे अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पणजीत परिवहन विभागात धरणे आंदोलन केले.

न्हयबाग जंक्शन अपघात प्रकरणी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मंगळवारी या भागाला भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली आणि ‘धारगळ आणि न्हयबाग पोरस्कडे जंक्शनवर उड्डाणपूल होईपर्यंत सिग्नल बसवण्यात येतील’ असे आश्वासन आमदार आर्लेकर यांनी दिले.

दरम्यान, यावर उपाय न काढल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

चारचाकी आणि दुचाकी यांच्यात रविवारी दुपारी अपघात होऊन दुचाकी चालक च्यारी यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे.

Pravin Arlekar
Mobile Phone Theft : बँकेत तक्रारीसाठी आला,अन् बँक अधिकाऱ्याचा मोबाईल घेऊन पळाला

राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून कित्येकांचे बळी जात आहेत. पोरस्कडे न्हयबाग जंक्शनवर उड्डाणपूल उभारावे किंवा या ठिकाणी जंक्शन रद्द करून पर्यायी मार्ग करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे याआधी केली आहे.

या ठिकाणच्या वाढत्या अपघातांमुळे या ठिकाणी सिग्नल बसवला जाईल. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.

‘जोपर्यंत उड्डाणपुलाचे काम होत नाही, तोपर्यंत येथे सिग्नल तरी बसवला जाईल’, असे आश्वासन आमदारांनी स्थानिकांना दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com