Panjim Municipality: महापालिकेला जाग; आयुक्तांनी टोचले कान!

Panjim Municipality: पणजीत आजपासून मोहीम करणार तीव्र
Panjim Municipality Corporation |Goa News
Panjim Municipality Corporation |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Municipality: बंदी असूनही ‘सिंगल यूज’ प्लास्टिक पिशव्या व अन्‍य वस्तूंची विक्री होत असतानाही पणजी महापालिका त्याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांनी याप्रश्‍‍नी आज अधिकाऱ्यांचे कान टोचले, तसेच कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे महापालिकेच्या बाजार समितीने आता उद्या बुधवारपासून प्लास्टिकविरोधी कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका अधिकारी व नगरसेवकांना कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्‍याचे दिसून आले. त्यांनी याबाबत आयुक्तांना कल्‍पना दिली. आयुक्तांनी आज सकाळी महापालिका निरीक्षकांना सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच अधूनमधून तपासणी करावी, असे स्पष्ट बजावले.

कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आल्यानंतर महापालिकेने धडक मोहीम राबविली होती. तत्कालीन महापौर उदय मडकईकर, बाजार समिती अध्यक्ष शेखर डेगवेकर यांनी मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविषयी जनजागृती केली होती.

शिवाय प्लास्टिक पिशव्यांच्‍या वापरावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीमही राबविली होती. त्यावेळी पहिल्या कारवाईसाठी 5 हजार तर दुसऱ्या कारवाईसाठी 10 हजार रुपये दंड आकरण्याचे निश्‍चित झाले होते. ही मोहीम काही महिने जोमात चालली. नंतर त्यात खंड पडला.

Panjim Municipality Corporation |Goa News
Panaji CCTV: पणजीत सीसीटीव्ही आहेत; पण सुरक्षा रामभरोसे

त्यानंतर मनपाची निवडणूक होऊन नव्याने महापौर झालेल्या रोहित मोन्सेरात यांच्या काळात सिंगल यूज प्लास्टिक वस्तू वापरावर बंदीचा निर्णय आला. त्यातून काही रक्कम दंडाच्या स्वरुपात तिजोरीत जमा झाले एवढेच.

"पणजी महापालिकेने प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकच्या सिंगल यूज वापराच्या वस्तूंविरोधात यापूर्वी जनजागृती केली आहे. तरीसुद्धा कोणी अशा पिशव्‍या, वस्‍तूंचा वापर करीत असेल तर त्‍यांच्‍यावर कारवाई करणारच. त्यासाठी मार्केट परिसरात एक निरीक्षक नेमण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्या निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली काही कामगार दररोज पाहणी करतील. शिवाय मार्केटमध्ये विक्रेत्यांना शिस्त लावण्याचाही प्रयत्न करतील."

- बेंतो लॉरेन, मनपा बाजार समिती अध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com