Goa Electricity: पणजी शहरात रविवारी दिवसभर वीजेचा लपंडाव अनुभवण्यात आला. वारंवार वीज खंडित होण्यामागील नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
सकाळपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने रविवारी पणजीतील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
रविवारी लोक घरी असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार संत इनेज परिसरातील काही रहिवाशांनी केली. सुटीच्या दिवशी लोकांना अशा गैरसोयीला सामोरे लागल्याने अनेकांचा हिरमोड झाला
त्यानंतर या वीज खंडित होण्याबाबत विद्युत विभागाच्या तक्रार केंद्रातील एका परिचराशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रविवारी आपल्याकडे कोणाकडूनही वीज खंडित झाल्याची तक्रार आलेली नाही. तसेच तक्रार रजिस्टर रिकामे दाखवले.
त्यानंतर रविवारी वारंवार वीज खंडित का होते, असे विचारले असता विद्युत विभागाच्या परिचराने या समस्येमागील नेमके कारण माहित नसल्याचे सांगितले.
काही वीज दुरुस्तीच्या कामामुळे अशी वीज खंडित होण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.