मुरगाव तालुक्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाऊगर्दी

मुरगाव तालुक्यात चौथ्या दिवशी 56 अर्ज दाखल
 Mormuga panchayat election
Mormuga panchayat electionDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: पंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीतील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाऊगर्दी केली होती. साकवाळ पंचायतीचे सात वेळा सरपंच पद भूषविलेले पंच सदस्य रमाकांत बोरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून आपली विजयी परंपरा चालू ठेवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर चिखली पंचायतीचे उपसरपंच कमला प्रसाद यादव यांनीही आपला विजय निश्चित असल्याची आशा व्यक्त केली. (Goa panchayat election 2022: Crowd to file nominations in Mormugao taluk )

 Mormuga panchayat election
गोवा पंचायत निवडणुक: ओबीसी आरक्षणाचा फैसला उद्याच

मुरगाव तालुक्यात पंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी 56 अर्ज दाखल करण्यात आले. यात सर्वाधिक सत्तावीस अर्ज साकवाळ पंचायतीतून दाखल झाले. निवडणूक अधिकारी कुंदन गडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत नामांकनाच्या चौथ्या दिवशी मुरगाव तालुक्यातील विविध सात पंचायतीमधून एकूण 56 जणांनी अर्ज दाखल केले. आजचा दिवस खूप व्यस्त होता.

कारण अनेक माजी सरपंच व उपसरपंच पंच व काही जणांच्या पत्नीने नामांकन दाखल केले आहे. ज्यात साकवाळ पंचायतीचे सात वेळा सरपंच पद भूषविलेले रमाकांत बोरकर तसेच तीन वेळा चिखली पंचायतीवर निवडून आलेले व उपसरपंच पद भूषविलेले कमला प्रसाद यादव यांनी आपल्या पत्नीसह उमेदवारी अर्ज वेगवेगळ्या प्रभागातून दाखल केले.

 Mormuga panchayat election
Calangute: इलेक्ट्रॉनिक दुकानात कामगाराकडून 12 लाखांची अफरातफर

दरम्यान आज नामांकित केलेले सर्वाधिक अर्ज साकवाळ पंचायतीतून 27 अर्ज दाखल झाले. यात गणेश लमानी (प्रभाग 1), विशाल गजानन नाईक, नारायण दत्ता नाईक, विशाल श्रीकांत नाईक, देविदास गुरुदास नाईक, (प्रभाग2), दोन एकूण चार अर्ज, अच्युत नाईक (प्रभाग 3), सातांनो मिनेझिस (प्रभाग 4), रमाकांत बोरकर (प्रभाग 5), निधी नरेश नाईक, निकिता शैलेश नाईक, (प्रभाग6), रजनी विनोद कमार, प्रियांशी सांगेलकर, चारुशी देसाई, रोहिणी तोरस्कर, सोनिया पागी, श्वेता गजींकर (प्रभाग 6) हा प्रभाग महिलासाठी आरक्षित आहे. रंगप्पा कमल, नितेश सावंत, (प्रभाग8), जारिया कादर (प्रभाग 9), सरस्वती लमाणी, अनुशा लमाणी, श्वेता नाईक, जयश्री लमाणी, (प्रभाग10), गिरीश पिल्लई (प्रभाग 11), असे मिळून 27 अर्ज दाखल करण्यात आले.

कुठ्ठाळी पंचायतीतून अनिता केंक्रे (प्रभाग 1), मारियानो डायस (प्रभाग 5), प्रतिमा लुकास (प्रभाग 7), एंजेला फुर्तादो (प्रभाग 8), लॉरेन्स मिस्किता (प्रभाग 9), लिदिया क्लेमेंत, उज्वला नाईक (प्रभाग 10), दिव्या रायकर, लता नाईक (प्रभाग 11) एकूण 10 अर्ज सादर करण्यात आले.

चिखली पंचायतीतून धोंडू कोचरेकर (प्रभाग1), सुनीता देवी यादव (प्रभाग 3), दत्तप्रसाद बांदोडकर, वासुदेव नाईक, संगीता भोसले (प्रभाग 4), कमला प्रसाद यादव, हेमंत फडते (प्रभाग 5), सपना कुराडे, दिपाली साळगावकर (प्रभाग 6), दीपक नाईक, प्रवीण गावडे (प्रभाग 7), ऐश्वर्या कोरगावकर (प्रभाग 10), इनासियो फर्नांडिस (प्रभाग 11), एकूण 13 अर्ज दाखल करण्यात आले.

केळीची पंचायतीतून निर्मला कोलाको (प्रभाग 1), कार्मेलीना डिसिलवा (प्रभाग 5), संताना सिल्वा (प्रभाग 6) एकूण 3 अर्ज दाखल झाले.

कासावली आरोशी- कुएली पंचायतीतून झेवियर पेरेरा (प्रभाग 2) मधून एकमेव अर्ज दाखल झाला.

वेलसांव- पाले- इसोर्सि पंचायतीतून नोरा डिसोझा (प्रभाग 1) व डोमिंगोस गोयस (प्रभाग 3) मधून एकूण दोन अर्ज दाखल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com