IFFI 2022 Traffic Diversion in Panjim : इफ्फीसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; पणजीतील कोणता मार्ग असणार बंद?

IFFI 2022 Updates: 20 ते 28 नोव्हेंबरपर्यंत चोख पोलिस बंदोबस्त
Panjim City
Panjim CityDainik Gomantak
Published on
Updated on

IFFI 2022 Updates: राजधानी पणजीत येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या काळात इफ्फीचे आयोजन करण्या आले असल्याने वाहतूक पोलिसांनी काही प्रमाणत वाहतूक मार्गात किंचित बदल केला आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या काळात चोख बंदोबस्त असेल.

इफ्फीचे उद्‍घाटन व समारोप कार्यक्रम ताळगाव पठारावरील श्‍यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार असल्याने पणजी वगळता इतर भागातून येणाऱ्या वाहन चालकांनी गोमेकॉ इस्पितळाकडून येण्याचे आवाहन वाहतूक पोलिस अधीक्षक बोसेट सिल्वा यांनी केले आहे.

जे कोणी इफ्फीच्या या उद्‍घाटन व समारोप कार्यक्रमासाठी पणजीतून येणार असतील ते ताळगाव किंवा दोनापावलच्या मार्गाने येऊ शकतात. या दोन्ही दिवशी कोणताच मार्ग बंद करण्यात आलेला नाही.

आयनॉक्सकडून पणजी मार्केटकडे जाणारा रस्ता हा इफ्फीच्या काळात बंद करण्यात येणार आहे. पार्किंगासाठी कार पासेस ईएसजीने दिलेल्या ओळखपत्राच्या गटवारीनुसार दिले जातील.

ज्यांच्याकडे झोन ए-1हा पास असेल त्यांना डॉ. श्‍यामाप्रसाद स्टेडियमध्ये, झोन ए-2पास असेल या स्टेडियमजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात तसेच इतर सर्व लोकांना वाहनांची पार्किंग गोवा विद्यापीठ क्रिकेट मैदानावर तसेच ऑल इंडिया रेडिओ कंपाऊंडवर करण्यात आली आहे.

या इफ्फीच्या काळात ज्यांच्याकडे ईएसजीने दिलेले कार पासेस असतील त्यांनाच आयनॉक्सच्या बाहेर वाहने पार्क करण्यास दिली जाणार आहे. इतरांना वाहनांची पार्किंग फुटबॉल मैदानावर करण्यात आली आहे. या काळात दयानंद बांदोडकर मार्गाच्या बाजूने वाहने पार्किंग करण्यास बंदी असेल, अशी माहिती सिल्वा यांनी दिली.

Panjim City
Vijai Sardesai: ‘सोनसोडो कचरा विल्हेवाटी संदर्भात मी खुल्या चर्चेस तयार’

कॅसिनोजवळ बेकायदा पार्किंग

पणजीत कसिनोंची कार्यालये असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पार्किंग केली जाते, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच वाहतूक सुरळीत होण्यास अडचणी होत आहेत.

त्यामुळे या कसिनोंच्या व्यवस्थापनांना बोलावून त्यांच्या कार्यालयासमोर कोणतीही वाहने पार्क करू नये, तशी नोटीस बजावण्यात आली आहे. वाहने पार्क केल्यास ती उचलून कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com