Tiswadi News : पाठलाग करून चोरट्याला अटक; जुने गोवे पोलिसांची कारवाई

अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला, अशी माहिती जुने गोवा पोलिसांनी दिली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Tiswadi News : घर फोडणाऱ्या चोरट्याला पाठलाग करुन जुने गोवा पोलिसांनी अटक केली. घर फोडणाऱ्या चोरींच्या प्रकरणात सामील असलेला गुन्हेगार सुमीर सकपाल शर्मा (मुळ : पंजाब) याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. आज अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला, अशी माहिती जुने गोवा पोलिसांनी दिली आहे.

शर्मा याला यापूर्वी जुने गोवा आणि गोव्यातील इतर भागांमध्ये मोठ्या चोरीसाठी अटक झाली होती. दिवसाढवळ्या आणि रात्री घर फोडण्याच्या प्रकरणांमध्ये तो मुख्य होता. त्याच्या आगमनाची माहिती मिळताच जुने गोवा पोलीस त्याच्या मागावर होते.

Goa Crime
Tiswadi : सांतान चर्च जवळील संरक्षक भिंत कोसळली, बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

विशेष पथक तैनात करून त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. आज तो जुने गोवा परिसरात घर तोडण्याचे अवजारे घेऊन संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला आणि दुचाकीसह पाठलाग करताना त्याला पकडण्यात आले. राज्यात इतर ठिकाणी केलेल्या चोरींच्या प्रकरणात चौकशीसाठी त्याला म्हापसा पोलिस ठाणे आणि इतर भागात नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com