Goa School : नवीन इंग्रजी प्राथमिक शाळांना मान्यता नाही : मुख्‍यमंत्री

Goa School : जर या धोरणाला बगल देऊन प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून देण्यास सुरूवात केली तर गोव्यातील शिक्षण क्षेत्राला ती गोष्‍ट घातक ठरू शकेल आणि हा प्रकार कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे आता नव्या इंग्रजी प्राथमिक शाळांना मान्यता देण्यात येणार नाही, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
Goa School
Goa SchoolDainik Gomantak

Goa School :

पणजी/सासष्टी, राज्‍यात यापुढे नव्या इंग्रजी प्राथमिक शाळांना मान्‍यता दिली जाणार नाही. मराठी किंवा कोकणी शाळेसाठी मंजुरी घेऊन इंग्रजी प्राथमिक शाळा सुरू केल्या तर त्या शाळेविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशा इशारा शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

गोव्यात काही ठिकाणी इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शाळा सुरू करण्याचे प्रयत्न चालले आहेत, असे पत्र कोकणी भाषा मंडळाने मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, या पत्राबाबत मला माहीत नाही, काय आहे ते पाहतो. मात्र प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच देण्याचे सरकारचे धोरण आहे.

जर या धोरणाला बगल देऊन प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून देण्यास सुरूवात केली तर गोव्यातील शिक्षण क्षेत्राला ती गोष्‍ट घातक ठरू शकेल आणि हा प्रकार कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे आता नव्या इंग्रजी प्राथमिक शाळांना मान्यता देण्यात येणार नाही, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

इंग्रजी माध्यमाच्‍या शाळांना परवानगी देऊन आम्ही मुलांच्‍या भावनिक, मानसिक व बौद्धिक विकासात बाधा आणत आहेत,. सरकारने कोकणी, मराठी प्राथमिक शाळा उघडण्यावर भर द्यावा, असे सिंगबाळ यांनी मुख्‍यमंत्र्यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले होते.

Goa School
Goa Disaster Management: 'सचेत' मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूर्ण : मुख्यमंत्री

आपत्ती व्यवस्थापन तयारी पूर्णत्‍वाकडे

पावसाळ्यात आपत्तीसंदर्भात वेळोवेळी माहिती देणारे ‘सचेत’ पोर्टल ॲप तसेच राष्ट्रीय आपत्ती सतर्कता पोर्टल किंवा मोबाईल ॲप प्रत्येकाने डाऊनलोड करावे. आपत्ती व्यवस्थापनाचे जिल्हा व तालुकावार नियंत्रण कक्ष स्थापन केलेले आहेत. आपत्तीची पूर्वचेतावनी देणारी प्रसार प्रणाली यंत्रणा ही बीएसएनएलच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शाळा ४ जून रोजीच सुरू होणार

यंदा शैक्षणिक वर्ष ठरल्यानुसार ४ जून रोजीच सुरू होणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी शाळा दोन दिवस उशिराने सुरू करण्याची मागणी केली होती. कारण ४ जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी असून, शिक्षक त्‍या कामात व्‍यस्‍त राहणार आहेत, असे त्‍यांचे म्‍हणणे होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com