New Zuari Bridge: राज्यात बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणाऱ्या झुआरी केबलस्टेड पुलाची दुसरी लेन आज म्हणजेच 22 डिसेंबरला सुरु होत आहे. तसेच पर्वरी येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाची पायाभरणी सोहळाही आज होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या लेनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याप्रकरणी वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दक्षिण व उत्तर गोव्याला जोडणारा नवा झुवारी पूल हा महत्वाचा दुवा असून वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने नव्या झुआरी पुलाची नितांत गरज होती.
काही दिवसांपूर्वी पुलाच्या दुसऱ्या लेनवर लोड टेस्टिंग करण्यात आले होते. झुआरी पुलाच्या दोन्ही लेन कार्यरत होत असल्याने पंणजी- मडगाव हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होणार आहे. अर्थात त्यामुळे वाहतुक कोंडीही सुटणार आहे.
दाबोळी येथे विमानप्रवासासाठी तसेच मडगाव येथे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळीच विमानतळावर किंवा रेल्वे स्थानकावर पोचणे शक्य होणार आहे.
विशेष म्हणजे गोव्यातील महत्वाच्या औद्योगिक वसाहतींपैकी असलेल्या वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या पुलाचा खूप फायदा होणार आहे.
केंद्रीय वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी हे नव्या झुआरी पुलांच्या बांधकामांचा आढावा घेत होते. आज त्यांच्याच हस्ते दुसऱ्या लेनचे उद्घाटन होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.