Goa Monsoon 2023: ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय

गोव्यासह शेजारच्या महाराष्ट्रातही पावसाने दमदार एन्ट्री केलीय.
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak

Goa Monsoon 2023 गोव्यात मागील तीन चार दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय. ऐन गणेशोत्सवाच्या काळात वरुणराजाने हजेरी लावल्याने भाविकांच्या उत्साहावर पाणी फिरल्याचे पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे आणखी काही दिवस पाऊस बरसण्यायोग्य हवामान तयार झाले आहे. गोव्यासह शेजारच्या महाराष्ट्रातही पावसाने दमदार एन्ट्री केलीय.

महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय झाला आहे. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या 24 तासात बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज रविवारी नागरिकांनी दिवसभरात घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

24 तासांत मुसळधार
महाराष्ट्रात पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तर 27 सप्टेंबरपर्यंत फक्त विदर्भात पावसाचा जोर असेल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

गोव्यातही जोरदार
राज्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने अधिक सक्रिय होत गोव्याच्या सर्वच भागात जोरदार हजेरी लावेली. काल चतुर्थीच्या पाचव्या दिवशी ठिकठिकाणी मिरवणूका निघाल्या होत्या मात्र गणेशभक्तांना भर पावसात गणपतींचे विसर्जन करावे लागले. रविवारी सकाळीही काही भागात पाउस पडला.

Goa Monsoon 2023
Goa Ghumat Arati: मोनी चाल, चंद्रावळ सुवारी सोबत रंगतेय 'घुमट आरती'... जाणून घ्या 'या' अनोख्या परंपरेचा इतिहास

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com