Goa Monsoon 2023 : राज्यात पावसाची अर्धशतकी मजल; पडझडीचे सत्र सुरूच

काणकोणात सर्वाधिक नोंद; नुकसानीच्या घटना वाढल्या
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरूच असून दरड कोसळणे, झाडे पडणे, घर व इतर संसाधनांच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे. सर्वत्र पाणी भरल्याने पावसाने दाणादाण उडवली आहे.

मॉन्सूनला सुरवात झाल्यापासून महिन्याभरातच पावसाने अर्धशतक पुरे केले असून आतापर्यंत राज्यात 50.6 इंच पावसाची बरसात झाली आहे.

मागील २४ तासांत राज्यात एकूण ७९.६ मि.मी म्हणजेच ३.१३ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत एकूण १२७१.६ मि.मी (५०.६ इंच) पाऊस पडला आहे. पंधरा दिवसांपूर्वी ५० टक्के पावसाचा तुटवडा होता. तो भरून काढत अतिरिक्त ९.८ टक्के पाऊस झाल्याने राज्यासाठी ही बाब दिलासादायक ठरली.

Goa Monsoon 2023
Goa Janata Darbar: राज्यात 'या' दिवशी भरणार दुसरा जनता दरबार; विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो उपस्थित राहणार

मागील २४ तासांत काणकोण येथे सर्वाधिक १२६.८ मि.मी. म्हणजेच ४.९६ इंच पाऊस बरसला असून त्याखालोखाल पेडणे येथे ९८.८ मि.मी., सांगे येथे ८२.१ मि.मी., मडगाव येथे ८१.३ मि.मी. केपे येथे ८०.८ मि.मी., दाबोळी येथे ७९.२ मि.मी., पणजी येथे ७९.७ मि.मी., म्हापसा ७६.२ मि.मी., फोंडा येथे ७३.४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

राज्यात मागील 12 तासांत घडलेल्या महत्त्वाच्या घटना

  • आडपई येथे घरावर झाड कोसळून मोठी हानी.

  • मोरजी येथे ५० वर्षे जुना पूल कोसळला.

  • बस्तोडा येथे घरावर झाड कोसळले.

  • मडगाव एसजीपीडीए मार्केट तिसऱ्या दिवशीही पाण्याने तुंबलेलेच.

Goa Monsoon 2023
Goa Accident : जयेशचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार; चिंबल वाहन पार्किंग वाद

वाळपई-साखळीत कमीच

राज्यात सरासरी पाऊस ५० इंच एवढा बरसला असला तरीदेखील वाळपई आणि साखळी परिसरात अजून पावसाने ४० इंच गाठले नाहीत. वाळपईत तर आतापर्यंत केवळ २९.९९ इंच पाऊस बरसला आहे.

एरव्ही सर्वाधिक पावसाच्या यादीत राहणाऱ्या वाळपईत सत्तरी तालुक्यातून सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल साखळी येथे ३८.७४ इंच पाऊस बरसला आहे. त्याखालोखाल फोंडा येथे ४६.५८ तर पेडणे येथे ४७.२७ इंच पाऊस बरसला आहे.

‘आमठाणे’च्या पातळीत वाढ

मेणकुरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर एवढे आहे. तर जलसाठ्याच्या पातळीची क्षमता ५० मीटर एवढी आहे. शुक्रवारी (ता.७) दुपारपर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी ४६.७ मीटर एवढी होती.

दुपारनंतर पडलेल्या पावसामुळे सायंकाळी जलसाठ्याची पातळी ४७ मीटरच्या नजीक पोहोचली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com