Margao News: 'सा जुजे द आरियलच्या नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या'; ग्रामसभेत ठराव

Margao News: विरोधी गटावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी
Margao News
Margao NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Margao News: शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळ्याच्यावेळी दंगल माजवली म्हणुन सा जुजे द आरियल येथील 20 नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत ते त्वरित मागे घ्यावेत अशा आशयाचा ठराव आज रविवारी सा जुजे द आरियल पंचायतीच्या ग्रामसभेत संमत करण्यात आला.

या ग्रामसभेत फक्त पुतळा प्रक्रणवरच चर्चा करण्यात आली. आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या विरोधात नाहीत मात्र हा पुतळा जंगल सदृश्य भागात उभारण्याचे कारण काय हे स्पष्ट करावे.

हा पुतळा उभारताना स्थानिकांना का विश्वासात घेतले गेले नाही याचेही स्पष्टीकरण देण्यात यावे अशी मागणी या ग्रामसभेने केली. ज्या वेळी हा हल्ला झाला त्यात सा जुजे द आरियल येथील कार्यकर्ते फ्रेडी त्रावासो यांनी त्या दिवशी जो हल्ला झाला तो जाणूनबुजून केला होता असा आरोप केला.

गावातील शांतता बिघडव्याच्या प्रयत्न केला असा आरोप केला. या प्रकरणी विरोधी गटावरही गुन्हे नोंद करावेत अशी मागणी या ग्रामसभेने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com