Ranji Trophy Cricket Tournament: गोव्याचा संघ साफ निष्प्रभ; संघावर फॉलोऑनचे सावट

Ranji Trophy Cricket Tournament: त्रिपुराच्या 484 धावांसमोर गमावल्या 53 धावांत 4 विकेट
Ranji Trophy Cricket Tournament:
Ranji Trophy Cricket Tournament: Dainik Gomantak

Ranji Trophy Cricket Tournament: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेत गोव्याचा संघ पहिल्याच लढतीच्या दोन दिवसांत साफ निष्प्रभ ठरला असून त्यांच्यावर फॉलोऑनचे सावट आहे.

खराब गोलंदाजीचा पूर्ण लाभ उठवताना एलिट क सामन्यात त्रिपुराने डोंगर रचला, नंतर पाहुण्या संघाचे चार गडी बाद करून वर्चस्व राखले.

आगरतळा येथील महाराज बीर बिक्रम स्टेडियमवर त्रिपुराने कालच्या 4 बाद 261 वरून शनिवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 484 धावा केल्या.

Ranji Trophy Cricket Tournament:
Goa Theft Case: पर्वरीत बाईक आणि मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

गोव्याने नंतर निराशाजनक फलंदाजी केली. ४ बाद ५३ अशी डळमळीत स्थिती असलेला गोव्याचा संघ ४३१ धावांनी मागे आहे. त्यांच्या डावात आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघात असलेला सुयश प्रभुदेसाई १३ धावांवर बाद झाला.

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला ‘पाहुणा’ राहुल त्रिपाठी फक्त नऊ धावाच करू शकला. रविवारी गोव्याचे फलंदाजीतील अपयश कायम राहिल्यास त्रिपुराला मोठी आघाडी घेणे शक्य होईल.

गोव्याचे गोलंदाजही प्रभावहीन

ज्या खेळपट्टीवर गोव्याचे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव टाकू शकले नाहीत, त्याच ठिकाणी त्रिपुराचे गोलंदाज प्रभावी ठरले. गोव्याच्या मोहित रेडकरने चार, तर लक्षय गर्ग, अर्जुन तेंडुलकर व विजेश प्रभुदेसाई यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, मात्र त्यांना त्रिपुराचा धावांचा ओघ रोखणे अशक्य ठरले.

Ranji Trophy Cricket Tournament:
Women's Cricket Tournament: गोव्याच्या महिलांचा 41 चेंडूंतच विजय

त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ चारशे धावा पार करू शकला. कालचा अर्धशतकवीर गणेश सतीश (७३) सकाळी लवकर बाद झाला, मात्र कर्णधार वृद्धिमान साहा याने उपकर्णधार मणिशंकर मुरासिंग याच्या साथीत गोव्याच्या गोलंदाजांना दाद दिली नाही.

त्यांनी सातव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. साहा याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. त्याने १५४ चेंडूंत १४ चौकारांच्या मदतीने ९७ धावा केल्या.

आक्रमक शैलीच्या मणिशंकर याने ५८ चेंडूंत पाच चौकार व एका षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. नवव्या क्रमांकावरील बिक्रमजित देबनाथ यानेही ३५ धावा करून गोव्याच्या जखमेवर मीठ चोळले.

त्रिपुराचा गोव्याविरुद्ध उच्चांक

त्रिपुराने शनिवारी पहिल्या डावात नोंदवलेली ४८४ ही धावसंख्या रणजी करंडक स्पर्धेत त्यांची गोव्याविरुद्ध उच्चांकी ठरली. यापूर्वी २०१८-१९ मोसमात त्यांनी आगरतळा येथेच या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सर्वबाद ३५८ धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा, पहिला डाव (४ बाद २६१ वरून): १२३.४ षटकांत सर्वबाद ४८४ (गणेश सतीश ७३, वृद्धिमान साहा ९७, रजत डे १३, मणिशंकर मुरासिंग ५०, बिक्रमजित देबनाथ ३५, राणा दत्ता ६, अभिजित सरकार नाबाद ०, लक्षय गर्ग २६-२-८७-२, अर्जुन तेंडुलकर २६-१-९४-२, दीपराज गावकर ११-१-३९-०, विजेश प्रभुदेसाई २६-३-९९-२, दर्शन मिसाळ ९-०-४६-०, सुयश प्रभुदेसाई ३-०-१२-०, मोहित रेडकर २२.४-३-७४-४).

गोवा, पहिला डाव: २२ षटकांत ४ बाद ५३ (सुयश प्रभुदेसाई १३, मंथन खुटकर १०, स्नेहल कवठणकर १५, राहुल त्रिपाठी ९, के. व्ही. सिद्धार्थ नाबाद ३, दर्शन मिसाळ नाबाद २, राणा दत्ता १-२१, अभिजित सरकार ३-१३).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com