Women's Cricket Tournament: गोव्याच्या महिलांचा 41 चेंडूंतच विजय

Women's Cricket Tournament: जम्मू-काश्मीरचा डाव 38 धावांत गुंडाळला
Women's Cricket Tournament
Women's Cricket TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

Women's Cricket Tournament: निकिता मळीक हिच्यासह गोव्याच्या गोलंदाजांनी जम्मू-काश्मीरचा डाव अवघ्या ३८ धावांत गुंडाळला आणि नंतर फलंदाजीत विजयी औपचारिकता एका विकेटच्या मोबदल्यात ४१ चेंडूंत पूर्ण केली. सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील त्यांचा हा सलग दुसरा विजय ठरला.

केरळमधील त्रिवेंद्रम येथील सेंट झेवियर्स केसीए क्रिकेट मैदानावर शनिवारी जम्मू-काश्मीर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.

निकिताच्या तीन विकेट, पूर्वा भाईडकर व व तरन्नुम पठाण यांच्या प्रत्येकी दोन विकेट, तसेच कर्णधार शिखा पांडे व प्रियांका कौशल यांच्या प्रत्येकी एका विकेटमुळे गोव्याने जम्मू-काश्मीरचा डाव १७ षटकांत गुंडाळला.

Women's Cricket Tournament
Arpora : डान्सबार, क्लब सारख्या गोष्टींना हडफडेत थारा नाही; कळंगुटमधील प्रकारावरही सरपंचांचे सडेतोड उत्तर, वाचा..

नंतर श्रेया परब हिच्या नाबाद २७ धावांच्या बळावर गोव्याने ६.५ षटकांत १ बाद ३९ धावा करून सामना सहजपणे जिंकला. गोव्याने अगोदरच्या लढतीत मेघालयाविरुद्ध ३०० धावांनी दणदणीत विजय नोंदविला होता. त्या लढतीत त्यांनी ३ बाद ३६४ धावा केल्यानंतर मेघालयाचा डाव ६४ धावांत गारद केला होता.

शनिवारी जम्मू-काश्मीरलाही गोव्याच्या दाहक गोलंदाजीचा सामना करता आला नाही. त्यांचा स्पर्धेतील तिसरा सामना उत्तर प्रदेशविरुद्ध होईल.

संक्षिप्त धावफलक

जम्मू-काश्मीर: १७ षटकांत सर्वबाद ३८ (रुद्राक्षी चिब १३, शिखा पांडे ५-०-१९-१, निकिता मळीक ६-२-१६-३, पूर्वा भाईडकर ३-३-०-२, तरन्नुम पठाण २-०-२-२, प्रियांका कौशल १-१-०-१) पराभूत वि.

गोवा: ६.५ षटकांत १ बाद ३९ (तेजस्विनी दुर्गड ३, श्रेया परब नाबाद २७, विनवी गुरव नाबाद १).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com