Goa Marathi Academy: गोवा मराठी अकादमीचे विविध पुरस्कार जाहीर 12 साहित्यिकांचा समावेश

वंसकर यांच्या ‘ऋषितुल्य धन्वंतरी’ला अ.का. प्रियोळकर पुरस्कार
Goa Marathi Academy
Goa Marathi AcademyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Marathi Academy : गोमंतकीय साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी गोवा मराठी अकादमीतर्फे विविध साहित्यिक पुरस्कारांची योजना जाहीर केली होती. राज्यातील विविध साहित्यिकांची एकूण ५७ पुस्तके आली होती. त्यापैकी एकूण १२ साहित्यिकांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

गोमंतकीय कथाकार नारायण महाले यांना ‘नाळ’ कथासंग्रहासाठी वि.स. सुखटणकर पुरस्कार, विठ्ठल गावस यांच्या ‘खाणमाती’ कादंबरीसाठी डॉ. सुभाष भेंडे पुरस्कार, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ या ललित गद्यासाठी प्रकाश खांडेपारकर यांना बा.भ. बोरकर पुरस्कार, रमेश वंसकर लिखित ‘ऋषितुल्य धन्वंतरी गोमंतभूषण- डॉ. सखाराम गुडे चरित्र पुस्तका’ला अ.का. प्रियोळकर पुरस्कार

Goa Marathi Academy
Healthy Tips: ऑफिसमध्ये काम करतांना 'ही' चूक करत असाल तर वेळीच व्हा सावध

प्रमोद भिसो कारापूरकर यांच्या ‘भानशून्य’ कवितासंग्रहाला शंकर रामाणी पुरस्कार, विठ्ठल गावडे पारवाडकर यांच्या ‘संतांच्या सांगाती’ या नाटकाला विष्णू वाघ पुरस्कार, डॉ. प्रमदा उज्ज्वल गावस देसाई यांच्या ‘जीएंच्या कथेतील स्त्रीविश्‍व’ पुस्तकाला वाङमयीन संशोधन बा.द. सातोस्कर पुरस्कार, सुदेश आर्लेकर यांच्या ‘गोमंतकीय भजन-संकीर्ण’ला पं. महादेवशास्त्री जोशी पुरस्कार

Goa Marathi Academy
Goa Politics | मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सावंत यांनी पक्षाशी सल्लामसलत केलेली नाही | Gomantak TV

प्रा. उल्हास प्रभू देसाई यांच्या ‘मध्ययुगीन भरतखंडाचे निर्माते विरुद्ध विध्वंसक इतिहास संशोधन’ या पुस्तकाला डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर पुरस्कार, कविता आमोणकर यांच्या ‘मर्मबंधातली ठेव’ या ललितगद्य पुस्तकाला सौ. वृंदा गणेश कंटक साहित्य पुरस्कार, कथा व ललितलेखन गोमंतकीय स्त्री लेखिकेसाठी विशेष पुरस्कार,

Goa Marathi Academy
Calangute Shivaji Maharaj Stachu: कळंगुटमधील 'तो' वाद काही शमेना, अद्यापही आरोप प्रत्यारोप सुरूच

एकनाथ म्हापसेकर यांना शशिकांत नार्वेकर मराठी कार्यकर्ता पुरस्कार, तर जनार्दन वेर्लेकर यांना गोमंतकीय मराठी साहित्य, कला आणि संस्कृती क्षेत्रात विशेष योगदानासाठी गोपाळराव मयेकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पुरस्कार प्राप्त सर्व गोमंतकीय साहित्यिकांना प्रत्येकी १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गोवा मराठी अकादमीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात गौरव करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com