Goa Update: 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याची भरघोस कमाई

नीलेश काब्राल यांच्या घरी समर्थकांची रीघ; 'इफ्फी'तील 'मास्टरक्लास' आता सर्व प्रतिनिधींसाठी खुला
Goa Live Update 20 November:
Goa Live Update 20 November:Dainik Gomantak
Published on
Updated on

 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याची भरघोस कमाई

यजमान या नात्याने 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचा सर्वाधिक खेळांत सहभाग होता, त्यामुळे त्यांच्या खेळाडूंचीही संख्या वाढली. राज्याचे 910 क्रीडापटूंनी प्रतिनिधित्व केले व एकूण 92 पदके जिंकण्यात यश मिळविले.

कलाकारांच्या उपस्थितीत इफ्फीचे दिमाखात उद्घाटन

गोव्याला फिल्म हब बनविण्यासाठी काम करत आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. तर, येत्या 2047 पर्यंत इफ्फीला जगातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव बनविण्यासाठी प्रयत्न करुया, असे अनुराग ठाकूर म्हणाले.

बाम्बोळीतील श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये 54 व्या इफ्फीचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी इफ्फीत पहिल्यांदाच बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरू दीक्षित यांना सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आले.

भाजप सरकारमधील प्रत्येक मंत्री भ्रष्टाचारात व घोटाळ्यामध्ये गुंतलेला 

काँग्रेसमधून फुटून भाजपवासी झालेला आठ आमदारांचा गट हा त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी नव्हे, तर त्यांना दिलेल्या वचनपूर्तीमुळेच भाजपात गेला. त्यांच्यातील एका आमदारांमुळे ते उघड झाले आहे.

विरोधात असलेला काँग्रेसचा गट फोडण्यामागे मास्टरमाईंड भाजपचा हात होता. भाजप सरकारमधील प्रत्येक मंत्री भ्रष्टाचारात व घोटाळ्यामध्ये गुंतलेला आहे. भाजपकडून लोकशाहीचा खून झालेला आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आज केला.

मंत्री मंडळात वर्णी लागल्यानंतर 'सासष्टी'बाबत आलेक्स सिक्वेरा यांचे मोठे विधान

भाजपला बळकट करण्यासाठी मी सासष्टीमध्ये नक्की काम करेन, कारण सासष्टी मध्ये भाजपच्या विचारसरणीची आणि भाजपला मानणारी जनता आहे.

त्यामुळे तुम्ही सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असे तुम्ही मानू शकत नाही असे मत सावंत सरकारच्या मंत्री मंडळात वर्णी लागलेले आलेक्स सिक्वेरा यांनी केले आहे.

सासष्टीमध्ये भाजप विस्तारण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी प्रयतन करेन. सासष्टीतील जनता नक्कीच भाजपला बहुमत देईल. याच संदर्भात आमच्याकड नावेलीचे उदाहरण असल्याचेही सिक्वेरा यांनी बोलून दाखवले.

Goa Minister Mauvin Godinho welcomes Unioun Minister Anurag Singh Thakur at Airport
Goa Minister Mauvin Godinho welcomes Unioun Minister Anurag Singh Thakur at Airport Dainik Gomantak

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर गोव्यात दाखल

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे गोव्यात दाखल झाले आहेत. अनुराग ठाकूर यांच्याहस्ते ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन होणार आहे. सोमवारी, दुपारी मंत्री माविन गुदिन्हो यांनी ठाकूर यांचे विमानतळावर स्वागत केले.

Bicholim Congress | BIcholim Police
Bicholim Congress | BIcholim Police Dainik Gomantak

डिचोलीतील कायदा व सुव्यवस्था पूर्वपदापर आणा - काँग्रेसची मागणी

डिचोलीतील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. राजरोस गुन्हे घडताहेत. गुन्हे वाढत चालले आहेत, अशी टीका करत तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणा, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. तसे निवेदन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने डिचोली पोलिसांना दिले आहे.

CM  Sawant in Sahkar Awards
CM Sawant in Sahkar Awards Dainik Gomantak

राजकारण, स्वाहाकार रोखल्यास सहकारी संस्थांची प्रगती - मुख्यमंत्री 

सहकार क्षेत्रात राजकारण व स्वाहाकाराला रोखल्यासच सहकार संस्थाची प्रगती होऊ शकते. तरुण पिढीला सहकार क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी सहकार संघाने प्रशिक्षण व जागृती करण्याची आवश्यकता आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

सहकार सप्ताहाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. सहकार क्षेत्रात बहुमोल कामगिरी केलेल्या सहकार कार्यकर्ते व संस्थांचा पुरस्कार देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MLA Nilesh Cabral with supporters at his own house
MLA Nilesh Cabral with supporters at his own houseDainik Gomantak

आमदार नीलेश काब्राल यांच्या घरी समर्थकांची रीघ 

भाजप श्रेष्ठींच्या सांगण्यानुसार मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले आमदार नीलेश काब्राल यांना भेटण्यासाठी त्यांचे समर्थक त्यांच्या घरी येत आहेत. सकाळपासूनच काब्राल यांच्या घरी समर्थकांची रीघ लागली आहे.

राजीनाम्याचा निर्णय आणि भविष्य काळातील दिशा याबाबत समर्थक त्यांच्याशी चर्चा करत आहेत.

रविवारी काब्राल यांनी राजीनामा दिला आणि आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपदाची शपथ दिली गेली. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या 345 पदांच्या कथित भरती घोटाळ्याच्या पार्श्वभुमीवर नीलेश काब्राल यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

IFFI 54 Masterclass
IFFI 54 Masterclass Dainik Gomantak

IFFI मधील 'मास्टरक्लास' आता सर्व प्रतिनिधींसाठी असणार खुला

गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'मास्टरक्लास' मधील सर्व सत्रे आता सर्व IFFI प्रतिनिधींसाठी विनामूल्य खुली असणार आहे. त्यामुळे मास्टरक्लासमधील प्रवेश सहज, सोपा असेल.

मास्टरक्लासमध्ये विविध मुलाखती, सेशन्स असतात. त्यातून सिनेमा ही कला, कलावंत यांची माहिती उलगडत असते. त्यामुळे आता या सत्रांमध्ये सहभागी होण्याची संधी चुकवू नका.

IFFI मध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) ला आजपासून गोव्यात सुरवात होत आहे. आज पणजी येथे आयनॉक्स शेजारी सकाळपासूनच चित्रपट रसिकांनी डेलिगेट्स कार्डसाठी गर्दी केली होती. तथापि, अनेकांना आयकार्ड मिळालेले नाहीत.

नेहमी येणाऱ्या अनेक पर्यटकांना देखील हाच अनुभव आला. त्यामुळे अशा प्रकारच्या आयोजनातून आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले धिंडवडे काढत आहोत, अशी भावना पत्रकार व्यक्त करत आहेत.

पीआयबी पत्रकारांना मदतीसाठी आहे की त्रास देण्यासाठी असा सवालही पत्रकारांमधून केला जात आहे. एक महिना आधी नोंदणी कार्डसाठी अप्लाय करूनही अनेकांना आज कार्ड मिळत नव्हते.

अनेक पत्रकार, सिनेरसिक, फेस्टिव्हल नेहमी अटेंड करणाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सकाळीच पणजी आयनॉक्स येथे गोंधळाचे वातावरण होते.

मुंबईचा पर्यटक तरूण चिंबल येथे बुडाला

मुंबईचा 19 वर्षीय पर्यटक तरूम चिंबल येथे बुडाल्याची माहिती आहे. डेरिक राज असे या तरूणाचे नाव आहे. मुंबईहून सात मित्रांचा ग्रुप गोव्यात पिकनिकसाठी आला होता. या ग्रुपमधील सर्वजण पोहायला गेले होते.

यावेळी ग्रुपमधील एका मुलीला पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ती गटांगळ्या खाऊ लागली. तिला वाचवण्यासाठी राज आणि आणखी एक मित्र पाण्यात गेले. पण मित्र परतला तरी राजला परत पाण्याबाहेर येता आले नाही. तो बुडाला.

रात्री ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाला रात्री डेरिकचा मृतदेह आढळून आला नाही. आज पुन्हा शोधमोहिम राबवली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com