फुकट प्रवाश्यांना महामंडळाचा दणका; 5 वर्षात 7 लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल

महामंडळाने महसूल गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
Kadamba Transport E-Bus
Kadamba Transport E-BusDainik Gomantak
Published on
Updated on

Kadamba Transport गोव्यात 70 टक्के नागरिक रोज बसप्रवास करतात. त्यात महिलावर्गाचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. लगतच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने महिलांना एसटी प्रवासांत विशेष सवलत मिळवून दिली आहे.

गोव्यात अशा योजना सुरु झाल्यास सरकारी तिजोरीवर काहीसा भर पडणार असल्याचे बोलले जात असतानाच रोज फुकट प्रवास करणाऱ्यांचा ताप KTC मागील काही काळापासून सहन करत होते. मात्र महामंडळाने महसूल गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

Kadamba Transport E-Bus
गोवा CET परीक्षा रद्द; अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशासाठी JEE Main, NEET चा स्कोअर धरला जाणार ग्राह्य

यातीलच एक भाग म्हणून या विषयसंदर्भातच एक महत्वाची बातमी हाती आलीय. कदंब महामंडळाने 2018-19 ते 2022-23 या पाच वर्षांच्या कालखंडात विनातिकीट म्हणजेच फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल 7 लाखांहून अधिक रकमेचा दंड वसूल केला आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात येतो. गेल्या पाच वर्षांत महिन्याला सरासरी 12 हजार, तर वर्षाला 1 लाख 44 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 2019-20मध्ये सर्वाधिक 2 लाख 36 हजार 875 रुपये दंड वसूल करण्यात आला.

Kadamba Transport E-Bus
National Games 2023: गोव्याच्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा 2 खेळाडूंना दंश

‍फुकट प्रवासी पकडण्यासाठी विविध मार्गांवरील बसची तपासणी केली जाते. 2019-20 मध्ये 26 हजार 791 बस, 2020-21मध्ये 23 हजार 114 बस, तर 2021-22 मध्ये 18 हजार 958 बस तपसण्यात आल्या.

या विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी कदंबतर्फे कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. तसेच या मोहिमेसाठी विशेष अधिकारी वर्गही तैनात करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांनी मागील काही काळात तब्बल 36 हजार 780 वाहकांची तपासणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com