Goa Highway News : राज्यात पडझड थांबेना ! धारगळ महामार्गावर दरड कोसळली, वाहतुक ठप्प

या डोंगरालगत पाण्याची टाकी आहे. भविष्यात ती टाकीही कोसळू शकते, अशी भीती रोहिदास हरमलकर यांनी व्यक्त केली आहे
landslide dhargal goa  highway
landslide dhargal goa highway Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी राष्ट्रीय महामार्ग ६६च्या रुंदीकरणाचे काम करत असताना रस्त्यालगत चुकीच्या पद्धतीने डोंगर कापणी केल्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याचा प्रकार वरचेवर घडत आहे. गेल्यावर्षी धारगळ येथे जिथे दरड कोसळली होती.

तिथेच आज पुन्हा दरड कोसळली. या डोंगरालगत पाण्याची टाकी आहे. भविष्यात ती टाकीही कोसळू शकते, अशी भीती रोहिदास हरमलकर यांनी व्यक्त केली आहे.राष्ट्रीय महामार्ग पत्रादेवी ते धारगळ महाखाजन पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम एमव्हीआर कंपनीला मिळालेले आहे.

landslide dhargal goa  highway
ISL ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न - FC गोवा | Gomantak TV

या कंपनीचा कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत आहे.धारगळ गेल्यावर्षी दरड कोसळून अर्धा रस्ता वाहतुकीस बंद केला. तो आजही बंदच आहे. दरड कोसळू नये, म्हणून एमव्हीआर कंपनीने तिथे संरक्षण भिंत उभारणीचा अयशस्वी प्रयत्न केला.

कंत्राटदार मनमानी पद्धतीने डोंगर कापणी करत होता. जर डोंगर सरळ रेषेत कापला नसता, आणि उताराच्या स्थितीत डोंगर कापला असता, तर ही दरड कोसळली नसती. या डोंगरालगत पाण्याची टाकी असून तिलाही धोका संभवत आहे. जनता दरबारात मंत्र्यांसमोर हा प्रश्न मांडला होता. परंतु त्यांनीही याची दखल घेतली नाही.

- रोहिदास हरमलकर, रहिवाशी धारगळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com