स्तनांच्या कर्करोगावरील अत्याधुनिक औषध मिळणार मोफत; गोवा आरोग्य खात्याचा कौतुकास्पद निर्णय

एका रुग्णावर वर्षाकाठी दीड ते दोन कोटींचा खर्च अपेक्षित असून, राज्याच्या आरोग्य क्षेत्रात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला असल्याचे राणे म्हणाले.
Goa Health Minister Vishwajit Rane
Goa Health Minister Vishwajit RaneDainik Gomantak

Goa Health Department: गोवा आरोग्य खात्याने महत्वाचा निर्णय घेतला असून, स्तनांच्या कर्करोगावरील अत्याधुनिक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्टूझूमॅब औषध मोफत दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील स्तानांच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 48 हिमोफिलीया तसेच, चार स्पायनल मस्क्युलर अट्रोफी (एसएमए) रुग्णांवर आरोग्य खात्याकडून मोफत उपचार केले जाणार आहेत.

एका रुग्णावर वर्षाकाठी दीड ते दोन कोटींचा खर्च अपेक्षित असून, राज्याच्या आरोग्य क्षेत्रात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला असल्याचे राणे म्हणाले.

याशिवाय स्तनाच्या कर्करोगासाठी दिले जाणारे पर्टूझूमॅब (Pertuzumab) औषधही मोफत दिले जाणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

हिमोफिलिया आजार काय आहे?

हिमोफिलिया हा एक प्रकारचा रक्तस्त्रावचा आजार आहे. हा एक अनुवांशिक आजार असून तो फार कमी लोकांमध्ये आढळतो. हिमोफिलियामुळे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे शरीरातून वाहणारे रक्त लवकर थांबत नाही.

SMA म्हणजे काय?

स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफी (SMA) हा एक अनुवांशिक रोग आहे. मुख्यतः लहान मुलांमध्ये हा आजार आढळून येतो. यामध्ये मेंदूच्या चेतापेशी आणि मणक्याच्या हाडांमध्ये समस्या उद्भवतात. त्यामुळे आजाराने ग्रस्त व्यक्तीचे शरीरावर नियंत्रण नसते आणि त्याला चालणे, हालचाल, श्वास घेणे आणि गिळण्यास त्रास होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com