Goa News : हरवळेतील मंदिर भंडारी समाजाचेच ; समाजबांधवांचा दावा

Goa News : वास्तविक या गोंधळ घालणाऱ्या लोकांवर देवस्थान समितीतर्फे दोन वेळा तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना या ठिकाणी येण्यापासून पोलिसांनी रोखण्याची आवश्यकता होती.
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

साखळी, हरवळेतील श्री रूद्रेश्वर मंदिर हे भंडारी समाजाचेच आहे. घटनेप्रमाणे या मंदिराच्या सर्व उत्सवांवर भंडारी समाजाचा अधिकार आहे. तरीही काही लोक मंदिराच्या उत्सवांमध्ये आपला शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

येथे आलेल्या महिलांनी हे बोलूनही दाखविले. आता आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा रूद्रेश्वर देवस्थानचे सचिव सुभाष किनळकर यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, उपाध्यक्ष दीपक नाईक, मुखत्यार संघेश कुंडईकर व इतरांची उपस्थिती होती.

७ एप्रिल रोजी रात्री मासिक पालखीवेळी उडालेल्या गोंधळानंतर रात्री उशिरा देवस्थान समितीतर्फे कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. किनळकर म्हणाले, पाच वाजल्यापासून पालखी बाहेर काढेपर्यंत कोणताही विषय नव्हता.

पण ८ वाजता पालखी बाहेर काढल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी रूद्रेश्वर मंदिरात गोंधळ घातलेल्या लोकांकडून पुन्हा गोंधळ घालत बेकायदेशीरपणे पालखी खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला.

वास्तविक या गोंधळ घालणाऱ्या लोकांवर देवस्थान समितीतर्फे दोन वेळा तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना या ठिकाणी येण्यापासून पोलिसांनी रोखण्याची आवश्यकता होती. परंतु, प्रशासनाने या लोकांना मोकळीक दिल्यानेच हा गोंधळाचा प्रकार घडला.

...दबाव कोणाचा?

या देवस्थानात गोंधळ घालणाऱ्या लोकांच्या विरोधात पोलिस तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तरीही त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यांना साध्या चौकशीलाही बोलावले नाही. उलट आमच्यावर सर्व बंधने घातली जातात.

पोलिस व प्रशासनावर कोणाचा दबाव आहे? हे मंदिर भंडारी समाजाचेच आहे. घटनेप्रमाणेच सर्व काही सण व प्रथा चालणार. यात कोणताही बदल होणार नाही. हे सर्वांनी ध्यानात ठेवावे, असा इशारा यावेळी यशवंत माडकर यांनी दिला.

Goa
Goa Congress: लोकसभा उमेदवार घोषणेनंतर गोवा काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य; भिके, सार्दिन नाराज

समाजाचे खरे ‘गॉडफादर’

यापुढे जेष्ठ नेते रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही चालणार आहे आणि गोव्यातील भंडारी समाज हा केवळ रवी नाईक यांच्या समवेत आहे. ते रात्री उशिरापर्यंत हरवळेत उपस्थित होते.

आता सर्व भंडारींनी जागृत झाले पाहिजे ‘एक भंडारी, नेक भंडारी’ या प्रमाणे निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर सर्व मतदारसंघ पिंजून काढत भंडारी समाजाच्या विरोधात कटकारस्थाने करणाऱ्या राजकारण्यांना त्यांची दाखवावी लागणार आहे, असेही किनळकर यांनी यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com