Rohan Khaunte : देखो अपना देश’ संकल्पना राबविणारे गोवा पहिले राज्य

मंत्री खंवटे : योग, निसर्ग, आरोग्य, आध्यात्मिक पर्यटनावर भर
Rohan Khaunte
Rohan KhaunteSandip Desai

पणजी : 'देखो अपना देश’ ही संकल्पना राबविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असून गोव्याची खरी ओळख जगाला करून देण्याची गरज असून राज्यात योग, निसर्ग, आरोग्य, आध्यात्मिक पर्यटनावर भर देण्यात येणार आहे. गोव्याची मूळ ओळख पुन्हा पर्यटनाच्या माध्यमातून जगाला होईल, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री म्हणाले, ‘देखो अपना देश’ या संकल्पनेनुसार गोव्यात पर्यटन क्षेत्राचा विकास केला जाईल. गोवा ही परशुरामभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. हे लक्षात घेता एक बाण आणि धनुष्य आकृतीच्या दोन भव्य शिल्पं मांद्रे समुद्र किनाऱ्यावर साकारण्याचा विचार आहे. इतर राज्यातील पर्यटकही गोव्यात यावेत, यासाठी पर्यटन खात्याचे अधिकारी आणि इतर भागीदार हे लवकरच उत्तराखंड राज्याला भेट देणार आहेत.

Rohan Khaunte
Goa Petrol-Diesel Price: गोव्यात महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल-डिझेल स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

अमृतसर, काशी, नाशिक, गुवाहाटी, नागपूर अशा आध्यात्मिक पर्यटन स्थळांप्रमाणे गोव्यातही पर्यटनाचा विकास करण्यात येणार आहे. राज्यात आम्ही चिखलकाल्याचे आयोजन करणार असून अनेक पर्यटक ते बघण्यास येतील. गोव्यात खूप काही बघण्यासारखे आणि समजून घेण्यासारखे आहे, जे आम्ही इथल्या संस्कृतीला धक्का न लागू देता पर्यटकांसाठी खुले करणार आहोत, असेही खंवटे म्हणाले.

Rohan Khaunte
Goa Accident News : कार अपघातात मावस भाऊ-बहीण ठार; मापा-पंचवाडी येथील घटना

पर्यटन केंद्रांची स्थापना

गोव्यात लवकरच सर्व महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधायुक्त अशी पर्यटन केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्राद्वारे योग, स्वास्थ्य, आंतरग्रामीण पर्यावरण आणि आध्यात्मिक पर्यटनावर भर दिला जाईल. पर्यटन हबच्या रूपात पर्यटन माहिती काउंटर असतील. या हबमध्ये पर्यटकांना गोव्याची आवश्यक माहिती तसेच स्वच्छतागृहे, शॉवर क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, पोलिसांसाठी, चेंजींग रूम्स इत्यादी सुविधा मिळतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com