Goa Fire Case: पुनश्च आगींचे सत्र? गोव्यात नक्की चाल्लंय काय? दिवसभरात काजू बागांना आग लागण्याच्या दोन घटना; हजारोंचे नुकसान

Goa Fire Case: तर मडगांवमध्ये स्टेशनरी दुकान जळून खाक
Goa Fire Case
Goa Fire CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fire Case: गोव्यात अपघातानंतर आता आगीचे सत्र सुरु झाले आहे. मागील वर्षीही गोव्यात जंगलात आणि काजू बागांना आगी लागून आगींनी थैमान घातले होते. दुर्दैवाने यंदाही आगीचे सत्र सुरु झालंय की काय असं वाटू लागलंय.

डिचोली-साखळी रस्त्याच्या बाजूने कुळण येथे दुपारी 12. 30 च्या सुमारास माळरानाला आग लागली. लागलेल्या आगीमुळे या माळरानाशेजारच्या काजूच्या झाडांची बरीच हानी झालीय. लागलेल्या या आगीमुळे झाडे होरपळली.

आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र आग चारही बाजूंनी भडकल्यामुळे अग्निशामक दलाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागली.

याच विषयासंबंधी अजून एक बातमी हाती आलीय. आज बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास मायणा नावेली येथील मोहित इस्पात कंपनीजवळ जंगलाला आग लागून जैविक संपत्ती जळाली.

त्यानंतर वाघुरे सत्तरी येथील व्याघ्रेश्वर मंदिराजवळ सुख्या गवताला आग लागून झाडे जळाल्याची घटना घडली. यावेळी वाळपई अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी जाऊन आग विझवली.

वाघुरे सत्तरी येथे दोन दिवसापूर्वी जंगल भागात आग लागून मोठ्या प्रमाणात झाडे जळाली होती. आज परत आग लागल्याने जंगलातील बरीचशी झाडे जळून खाक झाली आहे.

यावेळी वाळपई अग्निशमन दलाचे चंद्रकांत माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तुळशीदास झर्मेकर, रामा नाईक, कालिदास गावकर, साईनाथ सावंत, आनंद शेटकर, अविनाश गावकर आदीनी मदत कार्य केले.

गिफ्टच्या वस्तू आणि स्टेशनरी विक्रीच्या दुकानाला मडगावात पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान आग लागण्याचा प्रकार घडला आहे. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. या बरोबरच जवळ असलेल्या एका दुकानालाही काही प्रमाणात आगीची झळ पोचली आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com