Assagao Demolition: महासंचालक सिंग पडद्यामागील सूत्रधार! रोज नव्या खुलाशांमुळे आसगाव प्रकरण गोव्यात 'हॉट'

Assagao House Demolition Case: दबावापोटीच पीडित आगरवाडेकर कुटुंबीयांनी माघार घेतल्याचे सुतोवाच केले.
महासंचालक सिंग पडद्यामागील सूत्रधार! रोज नव्या खुलाशांमुळे आसगाव प्रकरण गोव्यात 'हॉट'
Assagao house Demolition | Goa DGP Jaspal SinghDainik Gomantak

आसगाव येथील प्रकरणामुळे गृहखात्याची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. आगरवाडेकर यांचे घर मोडून ती जागा दिल्लीस्थित पूजा शर्मा यांना मोकळी करून देण्याच्या षड्यंत्राचे मुख्य सूत्रधार गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग हेच आहेत, असा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

निलंबित हणजूण पोलिसांनी तशी माहिती दिली असल्याचे समोर येत आहे. परिणामी जसपाल सिंग यांना निलंबित करण्यासाठी पावले उचलावीत, अशी जनमानसातून मागणी होत आहे. आसगाव प्रकरण मुख्यमंत्री सावंत यांच्यासाठी अडचणीचे ठरू लागले आहे.

रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सिंग यांच्याच दबावामुळे पोलिसांनी एकतर्फी भूमिका घेतली, या शक्यतेला आता पुष्टी मिळाल्यात जमा आहे. गुन्हे खात्याने मात्र महासंचालक सिंग यांच्या संदर्भात भूमिका व्यक्त करणाऱ्या अहवालाचा मुद्दा फेटाळला आहे. दुसरीकडे दिल्लीस्थित पूजा शर्मा हिची वरपर्यंत कशी 'वट' होती, याचे पुरावे समोर येत आहेत.

पीडित म्हणतात, शर्माला नाहक अटक करू नका!

आसगाव घरफोडी प्रकरणातील पीडित आगरवाडेकर कुटुंबीय आज माध्यमांसमोर आले. त्यांनी आपल्यावर दबाव असल्याचे सांगितले. दबावापोटीच आपण माघार घेतल्याचे त्यांनी सुतोवाच केले.

यावेळी प्रींशा आगरवाडेकर यांना भावना अनावर झाल्याने त्यांनी अधिक बोलणे टाळले. त्यांच्या वतीने वकिलाने बाजू मांडताना सांगितले की, घटनेशी थेट संबंध नसलेल्या पूजा शर्मा यांना विनाकारण अटक करू नये. सखोल चौकशी करूनच प्रकरणाच्या मुळाशी जाणे योग्य ठरेल.

महासंचालक सिंग पडद्यामागील सूत्रधार! रोज नव्या खुलाशांमुळे आसगाव प्रकरण गोव्यात 'हॉट'
Goa DGP: आसगाव प्रकरण गोवा डिजीपींना भोवणार? विरोधक आक्रमक; निलंबनासह सहआरोपी करण्याची मागणी

आतापर्यंत आठजणांना अटक

आसगाव येथील घर पाडल्याप्रकरणी कालपर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यात आणखी तिघांची भर पडली आहे. आज तीन महिला बाऊन्सरना अटक करण्यात आली आहे. शाहीन सौदागर-कांदोळी, बिस्मील्ला गोरगुंडगी, नेरुळ व शालन मोरेकर, कांदोळी अशी त्यांची नावे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com