Goa Police News: वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये; पोलिस अधीक्षक राबवणार 'हा' उपक्रम

राज्याच्या पोलिस महासंचालकांनी पोलिस अधीक्षकांना दिले आदेश
DGP Jaspal Singh
DGP Jaspal SinghDainik Gomantak

Goa DGP Jaspal Singh: गोव्यात गेल्या चार दिवसांमध्ये खूनाच्या पाच घटना घडल्या आहेत. या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर आता राज्यातील पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग यांनी पोलिस अधीक्षकांना 'दरबार' आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत.

DGP Jaspal Singh
Goa Made Liquor Siezed: गोव्यातून कर्नाटकात नेलेल्या महागड्या दारूचा साठा जप्त

गोव्यात गेल्या चार दिवसांमध्ये पाच खून झाले आहेत. यातील बहुतांश घटनांमध्ये सहभागी असणारे गुन्हेगार आणि मृत हे परप्रांतीय असले तरी यातून गोव्याची प्रतिमा खराब होत आहे. विरोधकदेखील राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या आरोप करत धारेवर धरत आहेत. पोलिस यंत्रणाही अपयशी ठरल्याचे आरोप होत आहेत.

त्या पार्श्वभुमीवर आता पोलिसांनी पावले उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस महासंचालकांनी दरबार आयोजित करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत.

ज्या प्रमाणे राज्य सरकारकडून प्रशासन तुमच्या दारी, सरकार तुमच्या दारी, जनता दरबार असे उपक्रम राबवले जातात. तशाच पद्धतीने दरबार चा उपक्रम आता पोलिस दलातर्फेही राबवला जाणार आहे.

DGP Jaspal Singh
Goa First Fish Dryer: गोव्यात काही तासात मिळणार सुके मासे; नाममात्र शुल्क

यामध्ये नागरीकांची गाऱ्हाणी, समस्या, प्रश्न ऐकले जातील. त्यावर उपाय केले जातील. सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन लोकांमध्ये मिसळले पाहिजे. लोकांमध्ये जाऊन ग्राऊंड स्तरावर काम केले पाहिजे. लोकांच्या तक्रारी सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या.

विविध समाज गटांना, समुदायांना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहभागी करून घ्या. तसेच पोलिस अधीक्षकांनी पोलिस स्टेशन्सना भेटी द्याव्यात. लोकांच्या तक्रारी ऐकाव्यात, त्यांची सोडवणूक करावी, अशा सूचना पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com