Goa: नदी बुजल्यास पुराच्या आपत्तीची भीती

नदी बुजल्यास जोरदार पावसावेळी (Rain) पाणी बाहेर फुटून पुराची आपत्ती ओढवण्याचा धोका आहे.
बगलमार्गातील दगडमाती नदी फाट्यात सरकण्याचा प्रकार
बगलमार्गातील दगडमाती नदी फाट्यात सरकण्याचा प्रकारDainik Gomantak

डिचोली: राज्य महामार्ग (State Highways) अंतर्गत सुरु असलेल्या बगलमार्गातील दगड-माती डिचोली पालिका क्षेत्रातील पिराचीकोंड-देवकीनगर (प्रभाग-6) येथील नदीच्या फाट्यात सरकत असल्याने भविष्यात मोठी समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. नदीच्या पात्रात दगड-माती सरकत राहिल्यास नदी पात्र बुजून भविष्यात पुराची आपत्ती ओढवण्याची भीती नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

सध्या ही माती हळूहळू नदीच्या पात्रात सरकत असून भलेमोठे दगडही पात्रात कोसळलेले आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. अशी मागणी नागरिकांनी (citizens) केली आहे. नागरिकांच्यावतीने नगरसेविका ऍड. रंजना वायंगणकर यांनी डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले आहे. राज्य महामार्ग अंतर्गत डिचोलीत येणाऱ्या बगलमार्गाचे काम सध्या जोरात सुरु आहे.

हा बगलमार्ग व्हाळशी येथून पिराची कोंड भागातून पुढे वाठादेवच्या दिशेने जात आहे. या बगलमार्गात पिराचीकोंड-देवकीनगर येथे वाठादेव नदीचा फाटा येत आहे. हा फाटा पुढे डिचोली नदीला मिळत आहे. बगलमार्गासाठी सध्या खोदकाम सुरु असून, माती आणि दगड पिराचीकोंड-देवकीनगर भागातून जाणाऱ्या वाठादेव नदीच्या पात्रात सरकत आहे.

बगलमार्गातील दगडमाती नदी फाट्यात सरकण्याचा प्रकार
डिचोली-साखळी रस्ता अखेर खड्डेमुक्त

माती, दगड नदी फाट्यात

जोरदार आणि सततधार पाऊस पडला, की डिचोलीला पुराच्या आपत्तीचा धोका निर्माण होत असतो. यापूर्वी ही आपत्ती ओढवलेली आहे. आता नदी फाट्यात दगडमाती पडत असल्याने हा फाटा बुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदी बुजल्यास जोरदार पावसावेळी पाणी बाहेर फुटून पुराची आपत्ती ओढवण्याचा धोका आहे. तशी भीतीही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुराची संभाव्य शक्यता ओळखून नदीपात्रात दगडमाती सरकण्याचा प्रकार त्वरित बंद करावा. अशी मागणी डिचोली पालिकेच्या प्रभाग सहा च्या नगरसेवक ऍड. रंजना वायंगणकर यांनी केली आहे. तसे निवेदनही त्यांनी डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com